निमित्त गणेशोत्सवाचे कार्य जीवदानाचे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व करंजेपूल दूरक्षेत्र पुणे ग्रामीण यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर.

बारामती: वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व करंजेपूल दूरक्षेत्र पुणे ग्रामीण यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत असणारी सर्व गणपती मंडळे तसेच पोलीस पाटील, पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ, यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, व याच माध्यमातून ३५१ रक्तदात्यांनी ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ हे ब्रीद सत्य मानत, रक्तदान ही एक सामाजिक जबाबदारी आहे या विचारांनी आपले कर्तव्य पूर्ण केले.
शिबिरासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक,सचिन काळे यांच्यासह सर्व कर्मचारी यांनी या कार्यात मोलाचे सहकार्य केले.
३५१ जणांनी आपले रक्तदानाचे महान कार्य पूर्ण केल्याबद्दल पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक,सचिन काळे यांनी सर्वांचे आभार मानले व अभिनंदन केले.
रक्तदान हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान हे नि:स्वार्थ भावनेनं केलं पाहिजे. कारण आपल्या एका रक्तदानातून कोणाला तरी जीवदान मिळणार आहे.अपघात तसेच गंभीर आजारांमध्ये योग्य वेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता बळावते,अशावेळी प्रत्येक मानवाचे रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवु शकतात.
यामुळेच “रक्तदान हेच जीवनदान आणि सर्वश्रेष्ठ दान आहे”
अशी भावना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना व्यक्त केली.