Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; अवैध गुटखा आणि दारू विक्रीवर छापे, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0 4 7 3 2 9

वडगाव निंबाळकर: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले आहे. पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अवैध गुटखा वाहतूक आणि दारू विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन वाहनांसह एकूण ८ लाख ६ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:४० च्या सुमारास करण्यात आली. निरा-मोरगाव रोडवर चौधरवाडी हद्दीत पोलिसांनी संशयास्पद वाटणारी ह्युंदाई i20 कार (MH 42 AH 9353) अडवली. गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला आणि गुटखा आढळून आला. याप्रकरणी वैभव बाळासो चांदगुडे (रा. दंडवाडी, सुपा, ता. बारामती) याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत गुटखा आणि कार असा एकूण ३,९६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई २५ जानेवारी रोजी सायंकाळी लोणीभापकर (ता. बारामती) येथे करण्यात आली. अनिता दिलीप लोंढे ही महिला मारुती सुझुकी इको कारमधून (MH 42 BJ 1145) अवैध देशी-विदेशी आणि गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता, संबंधित वाहनात दारूचा साठा मिळून आला. पोलिसांनी ४,०९,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधित महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक दिपक वारुळे आणि त्यांच्या पथकाने केली.

4/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे