Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई; तीन जिल्ह्यांतून तडीपार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

0 9 5 2 3 7

बारामती: तडीपार आदेशाचे उल्लंघन करून बारामती शहरात राजरोसपणे वावरत असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला बारामती शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निलेश प्रदिप उमरदंड (वय २२, रा. कसबा, बारामती) असे या अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश उमरदंड याच्यावर तब्बल ९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कायद्याचा धाक राहावा म्हणून मागील वर्षी बारामती शहर पोलिसांनी त्याचा तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याला पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.

दरम्यान, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी बारामती शहर पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा तडीपार गुन्हेगार प्रगती नगर भागात आला आहे. या माहितीच्या आधारे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती मनिषा ओमासे यांनी आपल्या स्टाफसह प्रगती नगर येथील मामा केन परिसरात सापळा रचला आणि निलेश उमरदंड याला ताब्यात घेतले.

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल (गु.र.नं. ४३५/२०२६) करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई करून त्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन येथे सोडण्यात आले आहे.

असे तडीपार गुंड शहरात दिसून आल्यास नागरिकांनी पोलिसांना तत्काळ कळवावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन श्रीमती मनिषा ओमासे यांनी केले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती मनिषा ओमासे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस शिपाई सागर जामदार, चालक हृषीकेश जाधव आणि आरटीपीसी अक्षय कोळेकर यांच्या पथकाने केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे