गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई: साडेचार लाखांच्या अवैध दारूसह दोन आरोपी गजाआड श्रीगोंदा येथील गावठी दारूची भट्टीही केली उद्ध्वस्त; वाहनांसह ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
8
5
9
6
1
बारामती : पुणे जिल्ह्यातील माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत देशी व गावठी हातभट्टीच्या दारूसह दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून कार आणि दुचाकीसह एकूण ४,४६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कारवाईनंतर आरोपींनी दिलेल्या माहितीवरून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील एक गावठी दारूची भट्टीही पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंग गिल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि कुलदीप संकपाळ यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून एक व्यक्ती मोटारसायकलवरून गावठी दारू घेऊन येणार असून, ती बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील एका व्यक्तीला विकणार असल्याची ही खात्रीशीर माहिती होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ नियोजन करून कऱ्हावागज चौक येथे सापळा रचला. काही वेळाने संशयित मोटारसायकल तेथे आली आणि पाठोपाठ एक मारुती सुझुकी अल्टो कारही आली. मोटारसायकलवरील व्यक्तीने एक काळ्या रंगाचा ड्रम कारमध्ये ठेवताना पोलिसांनी झडप घालून दोघांनाही ताब्यात घेतले.




