Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सासवड पोलिसांची मोठी कारवाई, २१ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा जप्त

0 7 4 6 2 5

पुणे: सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेल्या प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्यावर सासवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ लाख ७० हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास सासवड पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मौजे बोपगाव (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत कानिफनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका गोदामामध्ये महाराष्ट्र शासनाने व अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा मोठा साठा करण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सासवड पोलिसांच्या पथकाने संबंधित गोदामावर छापा टाकला.

या छाप्यात पोलिसांना गोदामामध्ये ‘सिग्निचर फिनेस्ट पान मसाला’, ‘ॲक्शन ७ कंपनीचा सुगंधी तंबाखू’, ‘आर. के कंपनीचा सम्राट पान मसाला’, आणि ‘आर.के कंपनीचा एस.टी-१ कंपनीचा सुगंधी तंबाखू’ असा एकूण २१,७०,९६० रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई प्रणय राजेंद्र मखरे यांच्या फिर्यादीवरून सिराज शेख (रा. शीतल पेट्रोलपंपाच्या शेजारी, कोंढवा खुर्द, पुणे) या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांन्वये गुन्हा (गु.र.नं. २९२/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील करत आहेत.

ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, आणि भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, तसेच पोलीस अंमलदार विशाल जाधव, अभिजीत कांबळे, प्रणय मखरे, सचिन किवळे, अक्षय चिले आणि पल्लवी काळे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे