गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत धक्कादायक घटना: सासरच्या जाचाला आणि पतीच्या अनैसर्गिक अत्याचाराला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

0
8
8
7
2
8
बारामती : बारामती तालुक्यातील रुई येथे एका 19 वर्षीय विवाहितेने सासरच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला, तसेच पतीच्या अनैसर्गिक अत्याचाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजल माऊली ननवरे (वय 19 वर्षे 2 महिने, रा. रुई, ता. बारामती) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत मयत विवाहितेचे वडील दिपक हरिभाऊ रासकर (वय 45, रा. निर्मल नगर, तपोवन रोड, सावेडी, अहिल्यानगर) यांनी बारामती तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल सासरी नांदत असताना तिचा पती माऊली नामदेव ननवरे (रा. रुई, ता. बारामती) आणि सासू बायडाबाई नामदेव ननवरे (रा. शिंदेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी तिचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला.
तसेच, पती माऊली ननवरे याने सुजलच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून तिचे जगणे असह्य केले. या सर्व असह्य त्रासाला कंटाळून अखेर सुजलने 9 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री रुई येथील राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले.



