ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक:विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप पराभूत.मुरुम-वाल्हा गटात राष्ट्रवादीचा दणदणीत विजय,

0
9
5
7
8
9
बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुरुम-वाल्हा गट क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम रामराजे जगताप यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुरुम-वाल्हा गट क्रमांक २ मध्ये मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केले. विजयी उमेदवारांनी सरासरी ६,५७२ मतांच्या मोठ्या फरकाने हा विजय संपादन केला आहे.
विजयी उमेदवारांपैकी राजवर्धन शिवाजीराव शिंदे यांना १४,०१५ मते मिळाली. तसेच हृषीकेश शिवाजी गायकवाड यांना १३,९६१ मते आणि विक्रम आनंदराव भोसले यांना १३,८५४ मते मिळाली. दुसरीकडे, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम रामराजे जगताप यांना केवळ ७,३६४ मते मिळाली. त्यांच्यासोबतच वैभव गायकवाड यांना ६,१६८ मते, सतीश सकुंडे यांना ५,५६८ मते, संदीप चव्हाण यांना १,७६५ मते, राजेंद्र जगताप यांना १,७३३ मते आणि प्रवीण भोसले यांना २,१३७ मते मिळाली असून या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला.
या घसघशीत विजयानंतर विजयी उमेदवार विक्रम भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.




