गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
कुरणेवाडीत अंधश्रद्धेचा कळस; सोमनाथ जाधव यांच्या घरासमोर अज्ञातांकडून अघोरी कृत्य, परिसरात खळबळ

0
4
7
3
2
9
कुरणेवाडी (ता. बारामती): एकीकडे विज्ञान युगात जग प्रगती करत असताना, बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथे मात्र अघोरी प्रथेचा एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील रहिवासी सोमनाथ जगन्नाथ जाधव यांच्या घरासमोर आणि गावातील मुख्य चौकात अज्ञातांनी वाईट उद्देशाने अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ जाधव यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अज्ञातांनी पांढऱ्या रांगोळीने विशिष्ट आकृत्या काढल्या आहेत. घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की, एका मोठ्या गोलाकारामध्ये चौकोन आणि त्यामध्ये स्वस्तिक काढून, मध्यभागी लिंबू ठेवून तिला हळद-कुंकू वाहण्यात आले आहे. ही रचना एखाद्या अघोरी विधीसाठी किंवा जादूटोण्याच्या उद्देशाने केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

विशेष म्हणजे, सोमनाथ जाधव यांच्या दारासमोर जी आकृती काढली आहे, तसाच प्रकार गावातील मुख्य चौकात (जेथे तीन रस्ते एकत्र येतात) देखील आढळून आला आहे. याबाबत बोलताना सोमनाथ जाधव यांनी शंका व्यक्त केली की, “हा प्रकार कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा एखाद्या देवरूषी/मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार, आमचे काहीतरी बरे-वाईट करण्याच्या उद्देशाने केला गेला आहे. कुरणेवाडीसारख्या गावात इतक्या खालच्या पातळीवर जाऊन अशा प्रकारची नीच मानसिकता बाळगणाऱ्यांचा शोध घेणे गरजेचे आहे.”



