Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव धवडे यांची पुणे जिल्हा भाजपा पंचायतराज व ग्रामविकास आघाडीच्या सहसंयोजकपदी निवड

0 8 2 3 7 5

बारामती: बारामती येथील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते पोपटराव धवडे यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा पंचायतराज व ग्रामविकास आघाडीच्या सहसंयोजकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही नियुक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार राहुल कुल आणि पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तसेच, माजी आमदार संजय जगताप, भाजपा पुणे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे आणि पंचायतराज ग्रामविकास आघाडी पुणे जिल्हा संयोजक अमित खोमणे यांच्या सूचनेनुसार धवडे यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पोपटराव धवडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर त्यांनी आजवर प्रभावीपणे काम केले असून, त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असल्याचे मानले जात आहे.

या नियुक्तीमुळे पुणे जिल्ह्यात पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम करण्यास आणि ग्रामविकासाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास गती मिळेल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. याप्रसंगी बोलताना पोपटराव धवडे यांनी पक्षाने दिलेल्या या नव्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करत ग्रामीण विकासासाठी यापुढेही अधिक प्रभावी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे