Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती: रुई पाटीजवळ अवैध शस्त्रासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0 7 7 7 6 8

बारामती: बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई पाटी परिसरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या एका संशयित इसमाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत आरोपीकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई दिनांक ९ जुलै २०२६ रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.

ओम उर्फ लाला राजेंद्र कुदांडे (मूळ रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, सध्या रा. गुणवरे वस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. गस्तीवर असताना रुई पाटीजवळ एक इसम संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव आणि पत्ता विचारला. त्यानंतर सदर इसमाची पोलिसांनी अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ हे शस्त्र आणि काडतूस जप्त केले.

या प्रकरणी आरोपी ओम उर्फ लाला राजेंद्र कुदांडे याच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२०/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस उपनिरीक्षक कारंडे, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार स्वप्निल अहिवळे, गुलाब पाटील आणि रहीस मुलानी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे