Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सुपा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे मोठे यश; १.३५ लाख रुपये किमतीचे ०७ हरवलेले मोबाईल हस्तगत

0 6 8 2 0 3

सुपा : पुणे ग्रामीण पोलीस दलांतर्गत येणाऱ्या सुपा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. विविध तक्रारदारांचे हरवलेले सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे एकूण ७ मोबाईल फोन तांत्रिक तपासाद्वारे शोधून काढत ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार किसन ताडगे यांना सखोल तपासाचे आदेश दिले होते.

गुन्हे शोध पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून सखोल विश्लेषण केले. त्यानंतर पथकाने विविध भागांतून तसेच परराज्यातून शोध घेऊन ७ विविध कंपन्यांचे मोबाईल फोन हस्तगत केले. हे सर्व मोबाईल संच सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. प्रकाश पवार यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना सन्मानाने परत करण्यात आले. आपले हरवलेले मौल्यवान मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक बारामती मा. श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती मा. श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार आणि गुन्हे शोध पथकाचे पो.शि. २८६३ किसन ताडगे यांचा मोलाचा वाटा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे