अभिव्यक्तीगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
दौंड-पाटस येथील उमाजीराजे नाईक यांच्या फलकाची विटंबना; जय मल्हार क्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा
सावधान प्रशासन! आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन; नानासाहेब मदने यांचा इशारा.

0
6
1
1
8
4
बारामती: दौंड तालुक्यातील पाटस येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावाच्या फलकाची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा निषेध करत, दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ‘जय मल्हार क्रांती संघटने’च्या वतीने पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले.

जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या आदेशानुसार आणि पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन बारामती येथील पोलीस उपमुख्यालय (बऱ्हाणपूर) येथे देण्यात आले. यावेळी कर्तव्यदक्षक मा. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार साहेब यांच्या अनुपस्थितीत, अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेले मा. रमेश चोपडे साहेब (अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे) यांनी हे निवेदन स्वीकारले.




