Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

पॅशनला प्रोफेशन बनवा, यशाचे शिखर गाठा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्याना कानमंत्र पुण्यात ‘युईआय कलिनरी कॉम्पिटिशन-२०२५’चे दिमाखात उद्घाटन; देशभरातील १५० विद्यार्थ्यांचा सहभाग

0 3 9 4 5 7

मुळशी/पुणे: “हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी केवळ ‘काम’ म्हणून काम न करता, त्या कामाला आपले ‘पॅशन’ बनवले पाहिजे. जेव्हा तुमचे पॅशन तुमचे प्रोफेशन बनते, तेव्हा यशाची उच्च शिखरे गाठणे सहज शक्य होते,” असे प्रतिपादन युईआय (UEI) ग्लोबल एज्युकेशनचे व्यवस्थापकीय संचालक (MD) व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मनीष खन्ना यांनी केले.

युईआय ग्लोबल एज्युकेशनतर्फे पुण्यातील मुळशी येथील ‘द फॉरेस्टा रिसॉर्ट’ येथे आयोजित तिसऱ्या ‘युईआय कलिनरी कॉम्पिटिशन-२०२५’ (UEI Culinary Competition-2025) या पाककृती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी देशभरातील ९ कॅम्पसमधील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

              दिग्गजांची मांदियाळी

या उद्घाटन सोहळ्याला इंडियन कुलिनरी फोरमचे उपाध्यक्ष शेफ शिशिर सक्सेना, पुण्यातील JW Marriott चे एक्झिक्युटिव्ह शेफ मिहीर काले, मॅरियट इंटरनॅशनल (एशिया पॅसिफिक) चे माजी संचालक नरेश कपूर, IHM भोपाळचे माजी प्राचार्य आनंद कुमार, ICF चे जॉइंट सेक्रेटरी अरविंद राय, ITC चे निवृत्त एक्झिक्युटिव्ह शेफ आलोक, नोवोतेल- अकॉर ग्रुपचे शेफ गौरव मावरी, कुलिनरी कन्सल्टंट शेफ सिद्धार्थ शिंत्रे, YCMOU चे संचालक डॉ. जयदीप निकम, ताज हॉटेलचे निवृत्त एक्झिक्युटिव्ह शेफ हेमंत गोकळे आणि फॉरेस्टा रिसॉर्टचे एमडी विशाल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

            स्पर्धा: एक व्यासपीठ

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनीष खन्ना पुढे म्हणाले की, “युईआय ग्लोबल मागील २० वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. यूसीसी (UCC) हा उपक्रम म्हणजे केवळ एक स्पर्धा नसून, तो पाककलेचे विद्यार्थी, प्रशिक्षक आणि व्यावसायिक यांना एकत्र आणणारा सोहळा आहे. शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची, खाद्यकलेबद्दलची आवड जोपासण्याची आणि इंडस्ट्रीतील दिग्गजांशी संवाद (Networking) साधण्याची ही उत्तम संधी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी भारताची विविध संस्कृती आणि प्रादेशिक वारसा आपल्या पाककृतींतून सादर करतात.”

 

    स्पर्धेचे स्वरूप आणि पारितोषिके

गुरुवारी (दि. १८) सुरू झालेली ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. यामध्ये ‘मिस्ट्री बॉक्स चॅलेंज’, ‘ड्रेस अ केक’, ‘ग्लोबल बिर्याणी’ आणि ‘इनोव्हेशन फ्युजन’ अशा विविध आणि रंजक फेऱ्यांचा समावेश आहे. अंतिम फेरी ‘नॉक-आउट’ स्वरूपाची असेल. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्यांना रोख पारितोषिके व पदके देण्यात येतील. तसेच विजेत्याला ‘गोल्डन शेफ कोट’ (Golden Chef Coat) आणि प्रतिष्ठित ‘MasterChef UCC’ हा किताब देऊन गौरवण्यात येणार आहे.

१५० होतकरू शेफ्सचे कौशल्य पणाला

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना युईआय ग्लोबल एज्युकेशनच्या (पुणे) उपसंचालिका वैशाली पाटील म्हणाल्या, “या स्पर्धेत युईआयच्या सर्व कॅम्पसधून सुमारे १५० होतकरू शेफ्स सहभागी झाले आहेत. ते प्रादेशिक, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पदार्थ सादर करून ‘UCC Master Chef 2025’ या किताबासाठी कौशल्य पणाला लावतील.”

वैशाली पाटील यांनी संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेताना सांगितले की, “हॉस्पिटॅलिटी शिक्षण क्षेत्रात २० वर्षांचा अनुभव असलेल्या युईआय ग्लोबलने आजवर २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे. येथील विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्लेसमेंट मिळाली असून, संस्थेचे अभ्यासक्रम युके, स्वित्झर्लंड, कॅनडा आदी देशांमध्ये लॅटरल एंट्रीसाठी मान्यताप्राप्त आहेत.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे