
बारामती : परीसरात चोरीचे प्रमाणे वाढले असल्याकारणाने मा. पोलीस अधिक्षक यांनी गुन्हे उघड करण्याकरीता व त्यावरती प्रतिबंध करण्याकरीता गुन्हे पथकाला व पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन लोखंडे यांना सुचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांच्या सुचनेप्रमाणे गुन्हे पथकाने व पोलीस ठाण्याच्या इतर अंमलदारांनी हद्दीमध्ये गस्त वाढविली होती याच दरम्यान ता.०३/०६/२०२५ रोजी रात्री ११ वा चे दरम्यान फिर्यादी भिमराव रामचंद्र पिंगळे रा. पिंगळेवस्ती शिरष्णे ता. बारामती जि.पुणे हे आपल्या मोटारसाकल वरून पाहुणेवाडी गावचे हद्दीत फलटण बारामती रोडने घरी जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल आडवी मारून फिर्यादीस मारहाण करून फिर्यादीचा विवो कंपनीचा मोबाईल व खिशातील रोख रक्कम १८,०००/- रू जबरीने चोरी करून चोरून नेले या बाबत फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात माहिती कळवुन तशी फिर्याद दिली होती,लागलीच तक्रार दाखल झाल्याबरोबर माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे पथकाला बोलावुन सदर जबरी चोरी उघड करण्याबाबत मार्गदर्शन केले व तशा सुचना दिल्या सदर गुन्हयातील फिर्यादी यांचेकडे विचारपुस केली असता दोन आरोपी गुन्हा करीत असताना आपापसात बातचीत करीत असताना त्यातील एका आरोपीने दुस-या आरोपीस अक्षय या नावाने बोलावले असल्याबाबत फिर्यादी यांनी सांगितले त्याप्रमाणे स्वतः प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे व गुन्हे पथकाने गुप्त माहीतीदारामार्फत माहिती काढून व तांत्रिक माहीतीच्या आधारावर अक्षय चंद्रकांत जाधव वय.२४ वर्षे रा.खांडज ता. बारामती व मनोज उर्फ बाबु शिवराज गालफाडे वय १९ वर्षे रा. बुरूडगल्ली पाहुणेवाडी ता.बारामती यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी हि जबरी चोरी केल्याचे कबुल केले.

त्यांच्याकडून चोरी केलेल्या मुददेमालापैकी विवो कंपनीचा मोबाईल व ५,०००/- रोख रक्कम असा एकुण १८,०००/- रू किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
यातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असुन या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.

सदरची कामगीरी हि मा. पोलीस अधिक्षक संदिपसिंग गिल, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिराजदार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक देविदास साळवे, पो. हवालदार. राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अमोल राउत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे, जयसिंग कचरे, अमोल वाघमारे यांनी केली आहे.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा