Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत पोलिसांची मोठी कारवाई: मोती बाग चौकातील नाकाबंदीत ३९ वाहनांवर दंड; चोरीची दुचाकीही जप्त

0 5 8 4 3 2

बारामती : बारामती शहर आणि परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी बारामती शहर पोलीस आणि वाहतूक शाखेच्या वतीने ‘मोती बाग चौक’ येथे राबवण्यात आलेल्या विशेष नाकाबंदी मोहिमेत ३९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण ३०,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत एक चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत ही नाकाबंदी लावण्यात आली होती. यावेळी बेशिस्त वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले. पोलिसांनी केलेल्या हेडवाईज कारवाईची माहिती खालीलप्रमाणे आहे.

 * लायसन्स नसणे: ०९ केसेस

 * नंबर प्लेट नियमभंग: ०८ केसेस

 * ट्रिपल सीट: ०६ केसेस

 * रेड रिफ्लेक्टर नसणे: ०५ केसेस

 * इतर किरकोळ केसेस: ०५ केसेस

 * पोलीस इशारा न मानणे: ०३ केसेस

 * काळी काच (Black Film): ०२ केसेस

 * PUCC प्रमाणपत्र नसणे: ०१ केस

नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी केवळ दंडच केला नाही, तर महत्त्वाचे गुन्हेही उघडकीस आणले. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एका (०१) चालकावर कारवाई करण्यात आली. तसेच, तपासणी दरम्यान चोरीची १ मोटार सायकल पोलिसांच्या हाती लागली असून, यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

प्रत्यक्ष कारवाईत बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश माने, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप काळे, अमोल मदने, अजिंक्य कदम, आकाश कांबळे, पांडुरंग सापते, उत्तम खाडे, महिला पोलीस अंमलदार स्वाती काजळे, आशा शिरतोडे, सुनिता ढेंबरे, रूपाली जमदाडे, वंदना लोकरे आणि होमगार्ड जवान महुडे व थोरात यांनी सहभाग घेतला.

पोलीस आवाहन

वाहन चालवताना सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे