अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीमध्ये देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!

0
8
3
6
6
0
वडगाव निंबाळकर : ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. गावाची उज्ज्वल परंपरा जपत, विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या ग्रामस्थांचा आणि विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
सकाळी ८.३० वाजता ग्रामपंचायतीचे सरपंच मा. श्री. सुनिल दत्तात्रय ढोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वडगाव निंबाळकर येथील पोलीस ठाण्याच्या वतीने ध्वजाला व त्या नंतर स्वातंत्र्य विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित पाहुण्यांना मानवंदना दिली.


या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सी. एम. जाधव सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्या सौ. सारिका हनुमंत खोमणे यांनी केले.
वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीची अशी एक खास परंपरा आहे की, गावातील प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या किंवा सेवानिवृत्त असणाऱ्या मग त्यात महिला-पुरुष किंवा विद्यार्थी कोणीही असू द्या, अशा नागरिकांचा सन्मान केला जातो. कोणी नोकरीतून निवृत्त होते तर कोणाला नवीन नोकरी मिळालेली असते; गावातील प्रत्येक नागरिक व कुटुंबातील कोणी ना कोणी ज्यांनी कोणत्याही क्षेत्रात नाव मिळवले आहे, त्यांचा सत्कार करण्याची ही परंपरा यावर्षीही आवर्जून पाळण्यात आली.

याअंतर्गत नवीन शासकीय सेवेत रुजू झालेले ग्रामस्थ श्री. परमेश्वर सदाशिव खंदारे (केंद्र प्रमुख, वडगाव निं.), श्री. आसिफ लतिफ शेख (पुणे शहर पोलीस म्हणून नेमणूक),
कु. मोनिका लक्ष्मण दरेकर (पुणे जिल्हा उपशिक्षण अधिकारी – एमपीएससी),
कु. ज्योती नाळे (पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक),
श्री. जितेंद्र भगवान पवार (बारामती पंचायत समिती सदस्य पदी निवड),
श्री. किरण हनुमंत पानसरे (वकील म्हणून नियुक्ती),
श्री. मयूर छबुराव साळवे (अन्न व नागरी पुरवठा अधिकारी – एमपीएससी),
कु. ऋतुजा भाऊसो कोकरे (पोलीस म्हणून नेमणूक, पुणे शहर)
आणि श्री. अक्षय बाळासो राऊत (मुंबई पोलीस) यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शासकीय सेवेतून निवृत्त झालेले ग्रामस्थ
श्री. हनुमंत कोंडिबा आगम (शिक्षण विभाग),
श्री. संजय भाऊसो जाधव (मुख्याध्यापक),
श्री. अशोक धोंडीबा क्षीरसागर (शिक्षण विभाग),
सौ. अरुणा रविंद्र आगम (शिक्षण विभाग),
श्री. भिमराव शंकर पानसरे (हवालदार म्हणून निवृत्त), श्री. बाळासो सोपान खोमणे (हवालदार म्हणून निवृत्त) आणि श्री. सुनिल तुळशीराम हिरवे (आरोग्य सेवक म्हणून निवृत्त)
यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये प्राथमिक शाळा नं. २ च्या शालेय विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचेही कौतुक करण्यात आले. यामध्ये स्कॉलरशिप पात्र विद्यार्थी कु. आहाना मोसीम कोरबू, कु. शिवन्या अनिल जाधव आणि कु. आरोही राहुल दरेकर यांचा सत्कार झाला. तसेच मंथन ट्रॉफी २०२६ विजेते इयत्ता १ ली मधील कु. शिवन्या धनंजय भापकर (प्रथम), कु. श्रीमयी राहुल बनकर (द्वितीय), कु. रेणुका नवनाथ खोडके (तृतीय), इयत्ता २ री मधील कु. स्वामिनी योगेश राऊत, कु. ओवी सुजित हिरवे, कु. संस्कृती उमेश शिंदे आणि इयत्ता ३ री मधील कु. स्नेहा सचिन दरेकर यांचा गौरव करण्यात आला.

डायमंड स्पर्धा परीक्षा २०२६ मधील विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले.
दरम्यान येथील दोन्ही जिल्हा परिषद शाळा नंबर एक व दोन तसेच स्वातंत्र्य विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली तसेच शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
सरपंच श्री. सुनिल दत्तात्रय ढोले यांच्या अध्यक्षीय मनोगताने कार्यक्रमाची अंतिम रूपरेषा मांडण्यात आली.






