Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सर्व्हे मशिन चोरीचा छडा, पुणे ते हरियाणा तपास तांत्रिक तपासाच्या आधारे शिक्रापूर पोलिसांकडून दोघांना अटक तर ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

1 0 0 4 6 1

शिक्रापूर : डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील एका कंपनीतून पाच लाख रुपये किमतीचे सर्व्हे मशिन चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. यातील एका आरोपीला थेट हरियाणातून तर दुसऱ्याला पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, डिंग्रजवाडी येथील इगवुड प्रा.लि. स्कॅलार स्पेसेस कंपनीमधून जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणारे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सर्व्हे मशिन चोरीला गेले होते. याप्रकरणी संग्राम शामराव मोरे (वय ४४, रा. चिखली प्राधिकरण, चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासी अधिकारी पोलीस हवालदार अजित इंगवले आणि गुन्हे शोध पथकाला तपासाच्या तातडीने सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या तपासात हरी किशन जाटो (वय २४, रा. जोधपूर, राजस्थान) याला हरियाणा राज्यातून, तर त्याचा साथीदार अफाकजुद्दीन मुंताजिमुद्दीन काझी (वय ३६, रा. खडकी) याला पुण्याच्या विश्रांतवाडी भागातून शिताफीने ताब्यात घेतले.

​दोन्ही आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रीतसर अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी तीन लाख रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. या आरोपींनी अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

​ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार अजित इंगवले, रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, गणेश कुदळे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे, भारत भोसले, ललित चकनारायण आणि मयूर कुंभार यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार अजित इंगवले करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे