Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वाई तालुक्यात पूर्ववैमनस्यातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; जिवे मारण्याची धमकी

0 5 4 4 2 6

वाई : शेतात काम करत असताना पूर्ववैमनस्यातून एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत पाईपने बेदम मारहाण करून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना वाई तालुक्यातील बावधन येथे घडली आहे. याप्रकरणी दीपक दिलीप ननावरे याच्यासह त्याच्या दोन भावांवर आणि एका अनोळखी व्यक्तीवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​बावधन येथील रहिवासी मनोज हरिश्चंद्र नायकवडी (वय ४०) हे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास खडकमाळ शिवारात हळद पॉलिशचे काम करत होते. यावेळी संशयित आरोपी दीपक दिलीप ननावरे याने त्यांना फोन करून शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळातच तो स्वतःच्या कारने त्या ठिकाणी आला आणि त्याने काहीही न बोलता हाताने व ठिबकच्या पाईपने नायकवडी यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

​मारहाण केल्यानंतर आरोपीने त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. मात्र, कार सुरू न झाल्याने त्याने एका अनोळखी दुचाकीस्वाराला बोलावून घेतले आणि नायकवडी यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून बावधन येथील आपल्या घरी नेले.

​आरोपीने नायकवडी यांचे चुलते शामराव गणपत नायकवडी यांना फोन करून ‘तुझा पुतण्या माझ्या ताब्यात आहे, तू इथे आला तरच त्याला सोडणार’ अशी धमकी दिली. जेव्हा त्यांचे चुलते आणि चुलत भाऊ निखिल नायकवडी तिथे पोहोचले, तेव्हा आरोपी दीपक, त्याचे भाऊ प्रसाद दत्तू ननावरे आणि अक्षय राजेंद्र ननावरे यांनी मिळून त्यांनाही धक्काबुक्की व मारहाण केली. “२२ तारीख झाल्यावर तुला उचलून नेऊन मारून टाकेन,” अशी जिवे मारण्याची धमकीही यावेळी देण्यात आली.

​या गंभीर प्रकारानंतर मनोज नायकवडी यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय वाई येथे उपचार घेतले आणि वाई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी:

  1. दीपक दिलीप ननावरे

  2. प्रसाद दत्तू ननावरे

  3. अक्षय राजेंद्र ननावरे (सर्व रा. बावधन, ता. वाई) आणि एका अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  4. या प्रकरणाचा पुढील तपास वाई पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे