अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
गोजुबावी येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

0
8
0
9
0
7
गोजुबावी/बारामती : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गोजुबावी येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आणि प्रतिमा पूजन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

या प्रसंगी गोजुबावी येथील ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी तसेच मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर इत्यादी उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.




