Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक:  मतमोजणीत अजितदादांच्या पॅनेलची मोठी आघाडी; ‘कपबशी’च्या पारड्यात भरभरून मतदान विरोधकांना मोठा धक्का; पुरुषोत्तम जगताप गट पिछाडीवर

0 9 5 6 2 2

बारामती / सोमेश्वरनगर: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने मतमोजणीत निर्विवाद आघाडी घेतली असून, विजयाच्या दिशेने त्यांची दमदार वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे.

ही निवडणूक पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे आणि तिहेरी लढतीमुळे अत्यंत गुंतागुंतीची मानली जात होती. मात्र, आज सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना पुरस्कृत या पॅनेलला मतदारांनी मोठा कौल दिल्याचे दिसत आहे.

टेबल क्रमांक १ ते ९३ वरील मतमोजणीचे कल हाती आले असून, ‘कपबशी’ या निवडणूक चिन्हावर लढणारे अजितदादांच्या पॅनेलचे उमेदवार ठिकाणी अधिक मतांच्या फरकाने पुढे आहेत. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी तब्बल ८३ उमेदवार रिंगणात आहेत (यात ६२ उमेदवार प्रमुख पॅनेल्सचे तर २१ अपक्ष आहेत).

यापैकी ‘ब’ वर्गातून अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम सोरटे यांनी मोठी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला आहे. त्यांच्या पाठोपाठ उर्वरित २० जागांवरही अजित पवार गटाचेच उमेदवार प्रकर्षाने आघाडीवर असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

दुसरीकडे, या निवडणुकीत विजयासाठी संपूर्ण ताकद पणाला लावणारे पुरुषोत्तम जगताप यांचे पॅनेल आणि इतर विरोधक सध्या मतमोजणीत मोठ्या प्रमाणावर पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. प्रत्येक फेरीगणिक अजित पवार गटाची आघाडी वाढत चालली आहे.

अद्याप अंतिम निकाल जाहीर होणे बाकी आहे. मात्र, आज सुरू असलेल्या मतमोजणीतील कल पाहता, अजित पवार गट २१-० अशा निर्विवाद वर्चस्वाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, आता सर्वांचे लक्ष अंतिम अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे