गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत प्रेमी युगलाला कोयत्याने धाकाने लुटणारे तीन आरोपी जेरबंद; ३.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत बारामती तालुका पोलिसांची दमदार कारवाई.

0
6
4
8
8
7
बारामती : तालुक्यातील तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या तिघा अट्टल गुन्हेगारांना बारामती तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून ३ लाख २४ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून, बारामती तालुका पोलिसांनी ही कारवाई अवघ्या काही दिवसांतच पूर्ण केली आहे.

२६ फेब्रुवारी रोजी रात्री ८.४० च्या सुमारास तांदुळवाडी विमानतळ रोडवरील एलसी कंपनी लेक परिसरात फिर्यादी संतोष (नाव बदलले आहे) आपल्या मैत्रिणीसोबत बसले होते. यावेळी तोंडाला मास्क आणि रुमाल बांधून आलेल्या तिघांनी त्यांना घेरले. आरोपींनी लोखंडी सत्तूर आणि कोयत्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. जेव्हा फिर्यादीने प्रतिकार केला, तेव्हा एका आरोपीने त्यांच्या डाव्या पायावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले.
दरम्यान या घटनेत आरोपींनी त्यांच्याकडून खालील ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला
* सोन्याची चैन: २१ ग्रॅम (किंमत ३ लाख रुपये)
* चांदीचे दागिने: २ अंगठ्या व १ चैन (किंमत २२ हजार रुपये)
* रोख रक्कम: २ हजार रुपये
* एकूण लुट: ३ लाख २४ हजार रुपये
“पुन्हा या परिसरात दिसायचे नाही,”
अशी धमकी देत आरोपी तेथून पसार झाले होते.




