ब्रेकिंगमहाराष्ट्र
संतांचे कार्य जातीच्या चौकटीत अडकवू नका, राजाभाऊ चोपदार,वारकरी सेवा संघाचे राज्य संस्थापक अध्यक्ष.
बारामती शहर व तालुका वारकरी सेवा संघाच्या नूतन कार्यकारिणीचा नियुक्ती सोहळा संपन्न

0
5
9
3
3
9
बारामती : “महाराष्ट्रातील संतांनी समाजसुधारणेचे कार्य करताना जात, धर्म किंवा उच्च-नीच असा कोणताही भेदभाव केला नाही. मात्र, दुर्दैवाने आज काही मंडळी त्यांना जातींच्या चौकटीत बांधून पाहण्याचे काम करीत आहेत. संतांचे निरपेक्ष कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे,” असे परखड मत वारकरी सेवा संघाचे राज्य संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ चोपदार यांनी व्यक्त केले.
मोरयानगर, मेडद (ता. बारामती) येथील ‘वारकरी सदन’ मध्ये आयोजित बारामती शहर व तालुका कार्यकारिणीच्या नियुक्तीपत्र प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात बारामती तालुका, शहर आणि इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
बारामती तालुका कार्यकारिणी
* अध्यक्ष: जगन्नाथ जगताप
* कार्याध्यक्ष: दत्तात्रय भोसले
* उपाध्यक्ष: सतीश गावडे, मोहनराव भांडवलकर
* सचिव: निखिल कदम
* सहसचिव: ॲड. दिक्षाताई गाढवे
* प्रसिद्धी प्रमुख: सोमनाथ भिले
* इतर: बबनराव तावरे (संघटक), प्रियाताई जगताप (सहसंघटक), गणेश शिंदे (संपर्क प्रमुख), वैष्णवी पवार (सहसंपर्क प्रमुख), गोविंद चव्हाण (मार्गदर्शक).
बारामती शहर कार्यकारिणी
* शहराध्यक्ष: श्रीकांत झोरे
* कार्याध्यक्ष: सचीन गवारे
* उपाध्यक्ष: नितीन चालक, ज्ञानेश्वर गावडे
* सचिव: नानासो झांबरे
* खजिनदार: संजय धुमाळ
* प्रसिद्धी प्रमुख: राजेंद्र शिर्के
* इतर: प्रकाश कोळी, हणुमंत देवकाते, राजेंद्र सोळसकर, गणेश जोजारे, शत्रुघ्न घुले, लहु तावरे, अजित खटके, सचिन शिंदे.
इंदापूर तालुका निवड
इंदापूर तालुका अध्यक्षपदी सतीश खराडे आणि सचिवपदी अंकुश बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील १५ दिवसांत संपूर्ण इंदापूर कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे खराडे यांनी स्पष्ट केले.





