Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, चार जणांवर गुन्हा दाखल याच परिसरात तीन शाळकरी मुलींना अडवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती

0 7 8 9 3 9

बारामती : तालुक्यातील लोणी भापकर येथे सोमवारी सकाळी शाळेत सायकलवरून जात असलेल्या एका १३ वर्षीय विद्यार्थिनीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थिनी सोमवारी, २० जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सायकलवरून शाळेकडे जात होती. लोणी भापकर येथील दत्त मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या राखाडी रंगाच्या मारुती इको वाहनातील चार अनोळखी इसमांपैकी दोघांनी तिची सायकल अडवली. त्यांनी तिला जबरदस्तीने वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखून धाडस दाखवत स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर तिने हा घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड हे करत आहेत.
या घटनेमुळे लोणी भापकर परिसरात पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांसह काही स्थानिक पालकांनी असा दावा केला आहे की, गेल्या वर्षभरात याच परिसरात आणखी तीन शाळकरी मुलींना अडवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला आहे. या दाव्यामुळे खळबळ उडाली असून, याबाबत अधिकृत तक्रारी दाखल आहेत की नाही, याची पोलीस आता पडताळणी करत आहेत व या अनुषंगाने तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.व तपास सुरू आहे,

दरम्यान शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संशयितांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या घटनेतील संशयित व्यक्ती अथवा राखाडी रंगाच्या मारुती इको वाहनाबाबत कोणालाही काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे