बारामती :सोमेश्वरनगर येथील बरेच व्यावसायिक, नागरिक,मित्रपरिवार यांनी एकत्र येत दहा वर्षांपूर्वी एक व्हाट्सअप ग्रुप काढला आणि तो अखंड कार्यान्वित ठेवत दहा वर्ष पूर्ण केले.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील ‘समाजसेवा’ व्हाट्सअप ग्रुपला नुकतेच दहा वर्ष पूर्ण झाल्याने दशकपूर्ती निमित्त स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता,रविवार दि २२ रोजी निरा सोमेश्वर रोडवरील ‘ब्रह्मचैतन्य कार्यालय’ येथे ग्रुपमधील ज्येष्ठ मान्यवर यांच्या हस्ते केक कापून सदस्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा स्नेह मेळावा साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्वांचे स्वागत करून सुगम संगीताने करण्यात आली यामध्ये आळंदीकर बंधूंनी गीत सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
‘समाजसेवा’ या व्हाट्सअप ग्रुपने सर्व सदस्यांना बरोबर घेत अनेक समाजोपयोगी उपक्रम तसेच कार्यक्रम आतापर्यंत राबवले आहेत त्यात नैसर्गिक आपत्ती, महापूर, तसेच समाजातील गोरगरिबांना शैक्षणिक कार्यासाठी मदत,रक्तदान शिबिर सारखे उपक्रम या ग्रुपच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत, कोरोना काळातही कोरोनाग्रस्तांना बेड उपलब्ध करून देणे तसेच औषध उपचारासाठी मदत करणे अशी ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कामे करण्यात आली आहेत.

या गटामध्ये विविध राजकीय पक्षांचे लोक
सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय, उद्योग, व्यापार, शेती, सहकार अशा विविध क्षेत्रातील तसेच पत्रकार या मध्ये सदस्य आहेत. गटा मध्ये सर्वच पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यामध्येपुरंदर,भोर,बारामती,फलटण,इंदापूर,शिरूर या तालुक्यातून आहेत यांच्यासह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी,शिक्षक ,विविध संस्थांचे पदाधिकारी मिळून एक विचाराने एका मनाने गप्पा तसेच चर्चा घडवून आणतात यावर कधी कोणाचा विरोध असतो तर कधी कोणाची सहमती असते यावर मार्ग काढत बरेच विषय हाताळले जातात व त्यातून मार्गही काढले जातात यामुळे ‘समाजसेवा’ ग्रुप चे महत्व व कार्यपद्धती इतर व्हाट्सअप गटाच्या तुलनेने वेगळी आहे.

अशा अशा गटाचा आदर्श घेत इतर गटांच्या माध्यमातून सामाजिक कार्य घडावे,
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने एकत्र असण्याच्या ताकतीतून समाजसेवा करता येते हा आदर्श या गटाच्या माध्यमातून करून देण्यात आला.

हा सोहळा खेळीमेळीच्या,आनंदाच्या, तसेच पावसाच्या अल्हादायक वातावरणात संपन्न झाला, कार्यक्रमानंतर गटातील सर्व सदस्यांनी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेंडकर यांनी केले तर मनोगत योगेश सोळसकर यांनी व्यक्त केले ग्रुपमधील उपस्थित सर्व सदस्य व मान्यवरांचे समाजसेवा’ग्रुपचे ॲडमिन श्री.मदन काकडे यांनी आभार मानले.

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे असूनही वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एकत्र येत विविध विषयांवर विचार मंथन करून सामाजिक कार्य करू शकतात व ते घडू शकते हाच या ग्रुपचा संदेश आहे,
म्हणूनच तर ‘समाजसेवा’ ग्रुप कडे एक आदर्श ग्रुप म्हणून पाहिले जात आहे व अशा ग्रुपचा आदर्श प्रत्येक ग्रुपने घ्यावा, असे बोलले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा