गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
जातीवाचक शिवीगाळ करत सात जणांच्या टोळक्याची एकास मारहाण

0
7
1
2
5
6
बारामती : दिनांक 29/10/2025 रात्री 10:00 च्या सुमारास निरा बारामती रोडवर वडगाव निंबाळकर येथील इरिगेशन बंगला येथील अजित भोसले यांच्या घराजवळ तू आमचा वाद मिटवणार का असे म्हणत सात जणांच्या टोळक्याने जातीवाचक बोलत तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत संजय श्रावण साळवे रा.वडगाव निंबाळकर ता बारामती यांना लोखंडी फायटरने मारहाण केली, त्यात त्यांच्या उजव्या डोळ्याच्या वर जखम झाली व रक्त येऊन ते खाली पडले त्यावेळी संजय साळवे यांच्या सोबत असणारे सचिन साळवे हे त्यांना उचलण्याकरीता येत असताना टोळक्यातील काही जणांनी हाताने तसेच लाथाबुक्याने,छातीवर,तोंडावर,पाठीत जबर मारहाण केली.
त्याचवेळी टोळक्यातील एकाने हातात चाकु घेऊन संजय साळवे यांच्या अंगावर धावुन आला त्यावेळी सचिन साळवे यांनी त्यास बाजुला केले त्यामुळे पुढिल अनर्थ टळला.

वरील घटनेवरून संजय श्रावण साळवे यांनी आरोपी सुरज दरेकर,शुभम दरेकर,सौरभ दरेकर,भुषण दरेकर, ऋषिकेश दरेकर,ओंकार दरेकर,राहुल उर्फ बापु दरेकर सर्व रा वडगाव निंबाळकर दरेकर मळा ता बारामती जि पुणे यांच्या विरोधात वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, तक्रारीवरून वडगांव निंबाळकर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास डाॅ.सुदर्शन राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती हे करीत आहेत.





