गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगाव निंबाळकर परिसरात घरफोड्यांचे सत्र; नागरिकांनी घाबरू नये, पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन

0
5
8
4
3
2
वडगाव निंबाळकर: मागील दोन दिवसांपासून वडगाव निंबाळकर आणि परिसरात चोरी तसेच घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र, यातील अनेक घटनांमध्ये केवळ घरफोडी झाल्याचे समोर आले असून प्रत्यक्षात चोरी झालेली नाही. त्यामुळे या घटना केवळ दहशत निर्माण करण्यासाठी केल्या जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस आणि जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर परिसरात ठिकठिकाणी घरफोडीची प्रकरणे समोर येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, काही ठिकाणी चोरांनी घरात प्रवेश केला असला तरी मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कम लंपास केलेली नाही अपवाद काही घटना. केवळ कुलूप तोडणे किंवा घराची उचकापाचक करणे असे प्रकार घडले आहेत. यावरून हे प्रकार चोरीच्या उद्देशाने कमी आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी जास्त केले जात असल्याचे दिसून येत आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामार्फत सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.





