Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत थरार! तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; १५ हजारांची लूट, मुख्य आरोपीला अटक

भरदिवसा रिलायन्स मॉल परिसरातून तरुणाचे अपहरण. ​लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण. ​१५,३०० रुपये रोख आणि दोन मोबाईलची लूट; पाया पडून माफी मागायला लावत व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न. ​मुख्य आरोपी पिंटू उर्फ शरद धुमाळ याला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी.

0 6 7 5 8 2

बारामती (दि. ३०): बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील एका २३ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

​पुण्यात नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा प्रतिक धंगेकर हा तरुण २४ एप्रिल रोजी दुपारी बारामतीतील रिलायन्स मॉल परिसरात होता. त्यावेळी काही आरोपी एका कारमधून आले आणि त्यांनी प्रतिकला जबरदस्तीने गाडीत बसवून त्याचे अपहरण केले. आरोपी पिंटू धुमाळ याच्या पत्नीला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

​अपहरणानंतर आरोपींनी प्रतिकला तांदुळवाडी रोडवरील एका हॉटेलच्या गोडाऊनजवळ नेले. तिथे त्याचे दोन्ही मोबाईल हिसकावून घेत त्याला लाकडी दांडक्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. “पिंटू धुमाळ याच्या पाया पडून माफी माग,” असा दबाव टाकत आरोपींनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ शूट करण्याचाही प्रयत्न केला.

​या भयानक मारहाणीदरम्यान आरोपींनी प्रतिकच्या खिशातील १५,३०० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. झटापटीत त्याचे घड्याळही तुटून पडले, जे आरोपींनी सोबत नेले. तरुणाला गंभीर अवस्थेत रस्त्यावर सोडून देत, “पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू,” अशी धमकी आरोपींनी दिली.

प्रतिक धंगेकर याने दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात पिंटू उर्फ शरद धुमाळ, भारत मोहिते, अक्षय सोनवणे, अधिराज मोरे आणि इतर अनोळखी व्यक्तींविरोधात अपहरण, मारहाण आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांनी या प्रकरणी तातडीने सूत्रे हलवत मुख्य आरोपी पिंटू उर्फ शरद धुमाळ याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम आणि पोलीस जवान दादा दराडे करत आहेत.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे