Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सुपा पोलीस ठाण्यात लाचखोरीचा खळबळजनक प्रकार: दोन लाखांची मागणी, ५० हजारांच्या ऑडिओ क्लिपची सोशल मीडियावर चर्चा

0 9 9 7 2 0

बारामती : तालुक्यातील सुपा पोलीस ठाणे एका गंभीर आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वढाणे येथील एका गुन्ह्यात संशयित आरोपींच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी चक्क दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील ५० हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा उल्लेख असलेली एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वढाणे येथील एका गुन्ह्याच्या संदर्भात एका पोलीस हवालदाराने आरोपीच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी केल्याचे बोलले जात आहे. व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित हवालदार,

साहेब थोड्या रकमेत ऐकणार नाहीत, त्यांना जास्त पैसे द्यावे लागतील, असे सांगत असल्याचे ऐकायला मिळत आहे. 

यावरून या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे की केवळ त्यांच्या नावाचा गैरवापर करत परस्पर पैशांची मागणी केली जात आहे, हा खरं तर तपासाचा मुख्य विषय आहे.

या गंभीर प्रकरणाची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे.

केवळ सोशल मीडियावरील ऑडिओ क्लिपच्या आधारे आरोप सिद्ध होत नसले तरी, संभाषणाची सत्यता आणि त्यातील व्यक्तींची ओळख पटवणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास टिकून राहण्यासाठी या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून किंवा त्रयस्थ यंत्रणेमार्फत सखोल व पारदर्शक चौकशी व्हावी. तसेच यात जे अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर खातेनिहाय कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक स्तरातून जोर धरत आहे.

या प्रकरणातील ऑडिओ क्लिपची तांत्रिक तपासणी आणि सखोल चौकशीकरून पोलीस प्रशासन या कथित लाचखोरी प्रकरणाचा कसा छडा लावते आणि कोणावर कारवाईचा बडगा उगारते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे