अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांचा पुणे पोलीस आयुक्तांच्या हस्ते विशेष सन्मान; ३१ लाखांचे १४८ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश

0
8
3
2
3
9

पुणे : शहरातील विविध भागांतून हरवलेले तब्बल १४८ मोबाईल फोन शोधून काढण्यात पुणे पोलिसांना मोठे यश आले आहे. ‘सीईआयआर’ पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून शोधण्यात आलेल्या या मोबाईलची अंदाजे किंमत ३१ लाख रुपये आहे. हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. ही उल्लेखनीय शोधमोहीम पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या राबविण्यात आली.
या उत्कृष्ट कामगिरीची तसेच फुरसुंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात बजावलेल्या मोलाच्या भूमिकेची दखल घेत पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
फुरसुंगी येथील गुन्ह्यात त्यांनी स्थानिक पातळीवर अत्यंत नियोजनबद्ध शोधमोहीम राबवून आरोपीला अटक केली होती.
त्यांचे उत्कृष्ट तपास कौशल्य, कर्तव्यनिष्ठा, व्यावसायिक प्रावीण्य आणि समर्पित सेवाभावाचा गौरव करत, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांना प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले.




