Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीतील सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यांतर्गत अकोला कारागृहात स्थानबद्ध

0 9 3 2 1 5

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्यास असणारा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरणारा सराईत गुन्हेगार निशांत ऊर्फ भैय्या आप्पाजी मदने (वय 24 वर्षे, रा. क-हावागज, ता. बारामती, जि. पुणे) याला एमपीडीए कायद्यांतर्गत अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी मागील 5 वर्षांत जामिनावर सुटून पुन्हा गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निशांत मदने याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
निशांत मदने याच्याविरुद्ध सन 2023, 2024 आणि 2026 या वर्षांत विनयभंग करणे, जीवितास धोका निर्माण करणे, मृत्यू किंवा जबर दुखापतीची भीती दाखवून खंडणी उकळणे, घातक हत्यारांनी दुखापत करणे आणि खुनाचा प्रयत्न करणे असे एकूण 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी माळेगाव पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्यामार्फत पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता.
या प्रस्तावाची दखल घेत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निशांत मदने याला महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर इत्यादींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्ध करण्याचे आदेश 30 सप्टेंबर 2026 रोजी पारित केले. या आदेशानुसार माळेगाव पोलिसांच्या पथकाने 1 ऑक्टोबर 2026 रोजी निशांत मदने याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह अकोला येथे केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, माळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, तसेच अजय घुले, प्रवीण वायसे, वीरभद्र मोहोळे, विजय वाघमोडे, रुपाली धीवार, जालिंदर बंडगर, ज्ञानेश्वर मोरे, सागर पवार आणि श्रीकांत माने यांच्या पथकाने केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे