Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

पुण्यात रंगली चवदार लढत! दिल्लीचा विनोद विश्वकर्मा ठरला ‘मास्टर शेफ २०२५’; पुण्याच्या ओंकार आणि दानिशची बाजी

युईआय ग्लोबल एज्युकेशनची तिसरी राष्ट्रीय 'युसीसी' स्पर्धा उत्साहात; विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

0 3 9 4 5 7

 

पुणे : देशभरातील विविध चवींची रेलचेल, विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि परीक्षकांची दाद अशा भारावलेल्या वातावरणात ‘युईआय ग्लोबल एज्युकेशन’ची तिसरी राष्ट्रीय पाककृती (कलनरी) स्पर्धा अर्थात ‘युसीसी’ (UCC) पुण्यात मोठ्या दिमाखात पार पडली. या चुरशीच्या लढतीत दिल्लीच्या विनोद विश्वकर्मा याने अव्वल स्थान पटकावत “मास्टर शेफ २०२५” हा मानाचा किताब आपल्या नावावर केला, तर पुण्याच्या विद्यार्थ्यांनीही जोरदार कामगिरी करत दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.

युईआय ग्लोबलच्या युसीसी राष्ट्रीय स्पर्धेतील विजेता स्पर्धक आणि मान्यवर.

युईआय ग्लोबलच्या देशभरातील नऊ केंद्रांमधील हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. ‘मास्टर शेफ’ स्पर्धेच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भारतीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पदार्थ तयार करून परीक्षकांची मने जिंकली.

विजेत्यांची यादी आणि बक्षिसे:

 * प्रथम क्रमांक (मास्टर शेफ २०२५): विनोद विश्वकर्मा (दिल्ली) – याला ५१,००० रुपये रोख, सुवर्ण पदक, गोल्डन शेफ कोट आणि ‘मास्टर शेफ’ किताब देऊन गौरवण्यात आले.

 * द्वितीय क्रमांक: ओंकार राजू देशमुख (पुणे) – ३१,००० रुपये रोख पारितोषिक.

 * तृतीय क्रमांक: दंडोती मोहम्मद दानिश रियाज (पुणे) – ११,००० रुपये रोख पारितोषिक.

याव्यतिरिक्त, ‘मिस्ट्री बॉक्स चॅलेंज’ मध्ये महाराष्ट्राच्या शैलेंद्र लक्ष्मण परदेशी याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘ग्लोबल बिर्याणी फेरीत’ दिल्लीच्या अमिनेश अंबरने बाजी मारली.

दिग्गजांची मांदियाळी आणि मार्गदर्शन

या दिमाखदार सोहळ्याचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आयसीएफचे अध्यक्ष शेफ देवींदरकुमार, उपाध्यक्ष शेफ सिरीश सक्सेना, युईआय ग्लोबलचे सीईओ मनीष खन्ना, रेडिसन हॉटेलचे एमडी पंकज सक्सेना आणि रिटझ कार्लटनचे एमडी श्रीकांत पाट्रो यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी बोलताना डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “पाहुणचार आणि हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. या विद्यार्थ्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.”

युईआय ग्लोबलचे सीईओ मनीष खन्ना यांनी संस्थेच्या १९ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “ही केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांमधील कल्पकता, कष्ट, तंत्रज्ञान आणि अन्नाची चव या गुणांना पैलू पाडणारी कार्यशाळा आहे. आमचे विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

विद्यार्थ्यांना हॉटेल व्यवसायाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, यासाठी पुणे आणि देशभरातील अनेक नामवंत हॉटेलियर्स आणि शेफ्सना या स्पर्धेसाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाककृतींचे परीक्षण करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे