गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील फरार व मुख्य संशयित आरोपी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक,गोपाळ बदने पोलीस ठाण्यात हजर

0
6
6
7
7
0
बारामती : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील फरार व मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलीसांकडून करण्यात येत होता.पोलीस पथके पंढरपूर व पुणे येथे पाठवण्यात आलेली होती.परंतु काल रात्री उशिरापर्यंत गोपाळ बदने पोलीसांना आढळून आला नव्हता. दिनांक 26 रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण येथे दौरा आहे यामुळे पोलीस प्रशासनावर गोपाळ बदने याला अटक करण्याचे मोठे आव्हान व जबाबदारी होती.मात्र,काल रात्री उशिरा गोपाळ बदने हा स्वताहून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला.
मृत डॉक्टर महिलेनं तिच्या तळहातावर लिहिलेल्या नोटवर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने चारवेळा बलात्कार केल्याचं लिहिलं होतं. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती.घटना घडल्या नंतर पोलीस उपनिरीक्षक बदने पोलिसांना गुंगारा देत फरार होता.

दरम्यान रात्री उशिरा उपनिरीक्षक बदने हा स्वतः पोलिसांसमोर हजर झाला.यानंतर बदने याची पोलीसांनी एक तास कसून चौकशी केल्यानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात मेडिकलसाठी नेण्यात आले.
मेडिकलसाठी नेत असताना बदने याने माध्यम प्रतिनिधींना म्हटले की,”मला याप्रकरणात निष्कारण अडकवले जातेय”
संशयित आरोपी उपनिरीक्षक गोपाळ बदने याला आज दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे.
आज मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण येथे दौरा असून या प्रकरणावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणातील दुसरा आरोपी आरोपी प्रशांत बनकर याला ताब्यात घेऊन कोर्टात हजर करण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण यांच्याकडून संशयित आरोपी प्रशांत बनकर याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानं प्रशांत बनकर याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.





