Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत विनापरवाना फटाक्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर पोलिसांचा छापा; पावणेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

मळद येथील चिंचबनजवळ मोठी कारवाई; चौघांवर गुन्हे दाखल

0 7 2 8 8 9

बारामती : फलटण-बारामती रोडवरील मळद गावच्या हद्दीत विनापरवाना स्फोटक पदार्थांची (फटाक्यांची) धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १ लाख ७९ हजार ६२८ रुपयांचे फटाके आणि ६ लाख रुपये किमतीची चार वाहने असा एकूण ७ लाख ७९ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांवर भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार वैभव भगवान साळवे (नेमणूक: उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, बारामती) यांनी या संदर्भात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

यावरून पोलिसांनी खालील चार आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.

१) सोमनाथ सदाशिव होले (वय ५४, रा. खंडोबानगर, बारामती)
२) संदिप युवराज नेटके (वय ३३, रा. साठेनगर, कसबा बारामती)
३) गणेश बाबासाहेब गरगडे (वय ३२, रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा)
४) सुरेश बापूराव गवारे (वय ६०, रा. देसाई इस्टेट, बारामती)

मंगळवारी (दि. १६ जून २०२६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मळद (ता. बारामती) येथील फलटण-बारामती रोडवर चिंचबनजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपी हे त्यांच्या ताब्यातील चार मालवाहू गाड्यांमधून कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय स्फोटक पदार्थांची (फटाक्यांची) बेकायदा वाहतूक करत होते. मानवी जीविताला धोका निर्माण होईल अशा बेजबाबदार पद्धतीने आणि सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता ही वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ही वाहने अडवून कारवाई केली.
पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल
या कारवाईत पोलिसांनी चार वाहने आणि विविध प्रकारच्या फटाक्यांचे शेकडो बॉक्स जप्त केले आहेत.

पहिली गाडी (MH-42-M-1366): १ लाख रुपयांचे तीन-चाकी पेंजो वाहन आणि ३३,५०० रुपयांचे विविध प्रकारचे फटाके (एकूण १,३३,५००/-)

दुसरी गाडी (MH-45-7262): १ लाख रुपयांचे तीन-चाकी पेंजो वाहन आणि २६,३०० रुपयांचे फटाके (एकूण १,२६,३००/-)

तिसरी गाडी (MH-53-B-7773): २ लाख रुपयांचे महिंद्रा कंपनीचे वाहन आणि ७९,८२८ रुपयांचे फटाके (एकूण २,७९,८२८/-)

चौथी गाडी (MH-42-AQ-4924): २ लाख रुपयांचा अशोक लेलंड कंपनीचा ‘छोटा हत्ती’ आणि ४०,००० रुपयांचे फटाके (एकूण २,४०,०००/-)

एकूण जप्त माल: ६ लाख रुपयांची वाहने आणि १,७९,६२८ रुपयांचे फटाके मिळून एकूण ७,७९,६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपी क्र. १ ते ४ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५ व २८७ आणि मोटार वाहन कायदा कलम ६६, १९२, १९०(३) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २४०/२०२६) दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार महिला पोलीस हवालदार पवार यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI)  रत्नदिप भंडारे हे करत आहेत. या कारवाईमुळे बेकायदा फटाके वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे