Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

संत सावतामाळी इंग्लिश मीडियम स्कूलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘लीड शिक्षा पुरस्कारात’ देशात द्वितीय क्रमांक

0 6 3 7 1 8

डोर्लेवाडी बारामती : येथील संत सावतामाळी इंग्लिश मीडियम स्कूल (पॉवर्ड बाय लीड) या विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात गरुडझेप घेत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी दिला जाणारा प्रतिष्ठित ‘लीड शिक्षा पुरस्कार’ पटकावून विद्यालयाने संपूर्ण भारतात द्वितीय क्रमांक मिळवल्याची घोषणा करण्यात आली. या दैदिप्यमान यशामुळे शाळा आणि डोर्लेवाडी परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हा भव्य राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळा १७ एप्रिल २०२६ रोजी हैदराबाद येथे दिमाखात पार पडला. देशभरातील ५००० हून अधिक नामांकित शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या सर्वांमधून संत सावतमाळी स्कूलने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीमुळे द्वितीय स्थान निश्चित केले. ‘लीड ग्रुप’चे संस्थापक सुमित मेहता आणि नॅशनल अकॅडमी हेड लौकिक सर यांच्या हस्ते विद्यालयास हा सन्मान प्रदान करण्यात आला.

विद्यालयाने शाळेत १००% नवीन शैक्षणिक धोरणावर (NEP) आधारित अभ्यासक्रमाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता कृतीतून शिक्षण, उपक्रमाधारित शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिल्यानेच हे राष्ट्रीय यश साध्य झाले असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रोबोटिक्स आणि AI विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत सध्या कम्प्युटर कोडिंग शिकवले जात आहे. तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षात रोबोटिक्स (Robotics), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि सर्जनशील विचारसरणी (Creative Thinking) यांसारखे जागतिक दर्जाचे विषय सुरू करण्यात येत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळणार आहेत.

या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अभिजीत निंबाळकर सर, सुमित्रा निंबाळकर मॅडम, प्राचार्य पृथ्वीराज नवले, जयश्री थोरात, सोनाली सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक यांचे विशेष योगदान लाभले. या यशाचे सर्वत्र स्वागत होत असून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा आणि गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

“आमच्या शाळेने राबवलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा हा राष्ट्रीय सन्मान आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”

शाळा प्रशासन, संत सावतामाळी इंग्लिश मीडियम स्कूल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे