Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: ७८ लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

0 7 2 7 0 1

शिक्रापूर, दि. १५ – सुमारे ७८ लाख रुपयांच्या बेकायदेशीर गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अखेर चाकण येथून तीन दिवसांच्या सततच्या पाठलागानंतर ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे.

या प्रकरणी दि. ९ जुलै २०२१ रोजी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते (वय २२, रा. गवते वस्ती, चाकण, ता. खेड) याच्यासह एकूण १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल होताच आरोपी गवते हा फरार झाला होता. तो गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर तो सतत ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत होता.

दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. तांत्रिक तसेच स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपीला गवते वस्ती, चाकण येथून अटक केली. पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आल्याने गुटखा तस्करीविरोधातील कारवाईला आणखी बळ मिळाले आहे.

अटक आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याशी संबंधित इतर बाबी, आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या नेटवर्कचा तपासही पोलीस करीत आहेत. गुन्हा कितीही जुना असला, तरी कायद्याचा हात लांब असतो याची प्रचिती पुन्हा एकदा या कारवाईतून आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, सोमनाथ कचरे, पोलीस अंमलदार गणेश येळवंडे, नवनाथ केंद्रे, मयूर कुंभार यांनी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे