क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत सायकलपटूंचा थरार! पुणे ग्रँड टूरचा ‘सर्वात कठीण’ तिसरा टप्पा विद्या प्रतिष्ठानमध्ये संपन्न; १३४ किमीचा टप्पा गाठत परदेशी खेळाडूंचे बारामतीत जंगी स्वागत.
कडक ऊन आणि घाटाचा रस्ता पार करत आंतरराष्ट्रीय सायकलपटूंची बारामतीत धडक; पेन्सिल चौकात बारामतीकरांची उडाली झुंबड.

0
4
7
3
2
9
बारामती : भारताच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवलेल्या आणि आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियन (UCI) ची मान्यता असलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ (Bajaj Pune Grand Tour 2026) च्या तिसऱ्या टप्प्याचा (Stage 3) थरार आज बारामतीकरांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. “वेस्टर्न घाट गेटवे” (Western Ghats Gateway) म्हणून ओळखला जाणारा हा टप्पा स्पर्धेतील सर्वात लांब आणि कसोटी पाहणारा होता. सासवडच्या ऐतिहासिक भूमीतून सकाळी सुरू झालेला हा १३४ किलोमीटरचा वेगवान प्रवास आज दुपारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे मोठ्या दिमाखात पूर्ण झाला.

असा झाला १३४ किमीचा थरारक प्रवास
आज (दि. २२) सकाळी सासवड येथून या रेसला फ्लॅग-ऑफ करण्यात आले. सासवडमधून बाहेर पडताच सायकलपटूंना पानवडी घाटाच्या (Panwadi Ghat) आव्हानाला सामोरे जावे लागले. एका बाजूला अंगाची लाहीलाही करणारे दुपारचे ऊन आणि दुसऱ्या बाजूला नागमोडी वळणांचा घाट, अशा दुहेरी संकटावर मात करत सायकलस्वारांनी आपला वेग (Speed) कमी होऊ दिला नाही.

जेजुरी आणि नीरा ओलांडल्यानंतर रेसचा वेग प्रचंड वाढला. मोरगाव ते बारामती या मार्गावर सायकलपटूंनी ताशी ५० ते ६० किमी वेगाने सायकलिंग करत उपस्थितांची मने जिंकली.

दुपारी ४ च्या सुमारास सायकलपटूंचा ताफा बारामतीच्या हद्दीत दाखल झाला. बारामतीतील पेन्सिल चौक ते विद्या प्रतिष्ठान या मार्गावर दुतर्फा नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती. फिनिश लाईनवर पोहोचताच टाळ्यांच्या कडकडाटात आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे या परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.





