Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचालीची सांगता; विकासकामांचा आलेख उंचावला – सरपंच सुनील ढोले

0 5 5 5 3 3

वडगाव निंबाळकर (तालुका बारामती): बारामती तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या सन २०२१ ते २०२६ या पंचवार्षिक कार्यकाळाची नुकतीच अत्यंत दिमाखात आणि यशस्वी सांगता झाली. गेल्या पाच वर्षांत गावात रस्ते, पाणी आणि आरोग्यासारख्या अनेक मूलभूत सुविधांची कामे मार्गी लावत विकासाचा आलेख उंचावण्यात यश आले आहे. या संपूर्ण प्रवासात सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे प्रतिपादन सरपंच मा. सुनील दत्तात्रय ढोले यांनी केले.

या कार्यकाळात गावाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी बंदिस्त गटार योजना, प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा, मुख्य रस्ते व चौकांमध्ये हायमास्ट आणि पथदिवे (Street Lights) बसवणे, तसेच स्मशानभूमीची सुधारणा आणि गावातील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. या विकासकामांमुळे गावाच्या रूपरेषेत सकारात्मक बदल घडून आला असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.

केवळ निधी आणून थांबण्यापेक्षा तो निधी योग्य त्या विकासकामांसाठी वापरून कामे पूर्णत्वास नेण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. गावाचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने चालवण्यात आला. हे यश केवळ कोणा एका व्यक्तीचे नसून, संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीच्या एकजुटीचे आणि अखंड सहकार्याचे फळ असल्याचे सरपंच सुनील ढोले यांनी आवर्जून नमूद केले.

या यशस्वी कार्यकाळाची सांगता करताना ग्रामपंचायतीच्या वतीने एका विशेष कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासकीय कामकाज सुरळीत चालवणारे ग्रामविकास अधिकारी, गावाच्या प्रगतीसाठी झटणारे सर्व ग्रामपंचायत सदस्य, आणि अहोरात्र काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

“गावाच्या विकासासाठी सर्वांनी गटतट आणि राजकारण बाजूला ठेवून दिलेले सहकार्य, तसेच ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास यामुळेच हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलता आले. सर्वांच्या खंबीर साथीने गावचा कारभार सुकर झाला,” अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत सरपंच सुनील दत्तात्रय ढोले यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच श्री.सुनील दत्तात्रय ढोले,उपसरपंच,सौ. संगीता राजकुमार शहा,श्री. राहुल शिवाजी आगम,श्री. मोहन दौलत बनकर,श्री. प्रमोद पंडितराव किर्वे,सौ. प्रेमलता निलेश रांगोळे,श्री. अजित महादेव भोसले,सौ. सीमा सुभाष राऊत,सौ. लता गोरख परांडे,श्री. भानुदास दादासो दरेकर,सौ. राजश्री मिलिंद साळवे,श्री. संजय श्रावण साळवे,सौ. अश्विनी सुनिल खोमणे,श्री. धैर्यशील दिलीपसिंह राजेनिंबाळकर,सौ. सारिका हनुमंत खोमणे,सौ. स्वाती गणेश हिरवे तसेच बारामती पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य श्री जितेंद्र पवार  आणि श्री. राजेंद्र शंकर शिंदे,ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी श्री. दत्तात्रय तात्याबा चव्हाण,श्री. गोरख बाजीराव चव्हाण,श्री.चंद्रकांत आनंदराव बालगुडे,श्री. राजू बबन चव्हाण ,कु. रोहित सावता लोणकर,श्री. मनोज शिवाजी माकर,श्री.अजित गोरख खोमणे,सौ. ललिता संजय शिपलकर,श्रीमती. शोभा नारायण जगताप हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे