Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव निंबाळकर येथे पोलीस-पत्रकार समन्वय बैठक संपन्न; अल्पवयीन वाहनचालक आणि बेकायदा दारूवर कठोर कारवाईचे संकेत

0 7 4 6 2 5

वडगाव निंबाळकर: वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी श्री.जीवन मोहिते यांनी दिनांक २५ जून २०२६ रोजी पोलीस आणि पत्रकार यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने एका बैठकीचे आयोजन केले होते. समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आणि प्रसारमाध्यमांनी समन्वयाने काम केल्यास समाजात चांगले परिणाम पाहायला मिळतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुमारे वीस ते पंचवीस दिवसांनंतर ही बैठक पार पडली. दरम्यानच्या काळात सरपंच तसेच पोलीस पाटील यांच्या बैठका घेतल्याने आणि पदभार स्वीकारताच कार्यालयीन कामामुळे पत्रकारांना वेळ देता आला नाही, त्याबद्दल श्री. मोहिते यांनी दिलगिरी व्यक्त केली. बैठकीच्या सुरुवातीला सर्व माध्यम प्रतिनिधींची ओळख करून घेण्यात आली. पत्रकारांनी केलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी बोलताना प्रभारी अधिकाऱ्यांनी स्थानिक पत्रकारांच्या सकारात्मक भूमिकेचे विशेष कौतुक केले.

येथील पत्रकारांच्या संवेदनशील आणि जबाबदार दृष्टिकोनामुळेच परिसरात जातीय तसेच धार्मिक सलोखा टिकून राहण्यास मदत झाली आहे. येथील पत्रकार कोणत्याही तेढ निर्माण करणाऱ्या किंवा अनावश्यक गोष्टींना महत्त्व न देता अत्यंत जागरूकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. पत्रकारांच्या याच सामंजस्याच्या भूमिकेबद्दल श्री. मोहिते यांनी समाधान व्यक्त करत सर्व पत्रकारांची प्रशंसा केली.

कायदा व सुव्यवस्था योग्य राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील आणि कडक कारवाया केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने ११२ या पोलीस हेल्पलाईनवर बोगस कॉल करून चुकीची माहिती देणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल. तसेच, हातभट्टी दारूच्या निर्मिती व विक्रीवर झिरो टॉलरन्स धोरण राहील. याबाबत कोणताही दबाव सहन केला जाणार नाही आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

नुकत्याच चौधरवाडी येथील अपघातात अल्पवयीन तीन मुलांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा संदर्भ देत श्री. मोहिते यांनी सर्व पालकांना एक महत्त्वाचे आवाहन केले. जे पालक आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यास देतील आणि अशी घटना समोर आल्यास संबंधित पालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

समाजमाध्यमांचा वापर योग्य पद्धतीने असावा. लहान मुले-मुली यात स्वतःला गुंतवून घेतात, त्याचे गंभीर परिणाम त्यांच्या शालेय व सामाजिक जीवनावर पडतात. कधी कधी यातूनच मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. त्यामुळे समाजातील हे धोके ओळखण्यासाठी जागरूक पत्रकार म्हणून तुमचे अशा गोष्टींकडे लक्ष असायला हवे, अशी सूचना प्रभारी अधिकाऱ्यांनी यावेळी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे