Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

फेसबुकच्या आमिषाने लुटलेला ५१ हजारांचा मुद्देमाल फिर्यादीला सुखरूप परत; बारामती पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक

0 8 6 2 9 9

बारामती : फेसबुकवरील स्वस्त गव्हाच्या आमिषाला बळी पडून दरोडेखोरांकडून लुटले गेलेले तासगावचे व्यापारी सुरज सर्जेराव गावडे यांना त्यांचा १०० टक्के मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेद्वारे परत मिळवून देण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे.

दिनांक ४ मे २०२६ रोजी फेसबुक जाहिरातीवरून गावडे यांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी बारामतीत बोलावण्यात आले होते. पियाजिओ कंपनीच्या पाठीमागे एका निर्जन ठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्या कपाळावर पिस्तूल रोखून बेदम मारहाण केली. तसेच, त्यांच्याजवळील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५१,५०० रुपयांचा ऐवज लुटला. या घटनेनंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या वेरना कारचा १४ गावांमधून पाठलाग करून सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.

या गुन्ह्यात शिताफीने अटक करण्यात आलेले आरोपी रवी माने, श्रीकांत घुले, अभिषेक ठोंबरे आणि अतुल भोलनकर (सर्व रा. बारामती) यांच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेली संपूर्ण रोकड (२५,५००/- रु.) आणि दागिने असा एकूण ५१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

​सदरचा मुद्देमाल ‘भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ कलम १०६(३)’ मधील तरतुदीनुसार, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी कायदेशीर प्रक्रियेद्वारे फिर्यादी सुरज गावडे यांना सुपूर्द करण्यात आला आहे.

ही समाधानकारक कामगिरी विद्यमान पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तपासी अंमलदार सपोनि विक्रम पवार आणि मुद्देमाल कारकून म.पो.हवा. भारती खंडागळे यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली.

​चोरीला गेलेली आपली कष्टाची कमाई आणि दागिने सुखरूप परत मिळाल्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर हसू परतले असून त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.

बारामती पोलिसांच्या या उल्लेखनीय आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे नागरिकांचा कायद्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे