Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

गुन्हेगारांना आता पळता भुई थोडी! बारामती ग्रामीण पोलिसांची एमआयडीसी परिसरात ‘डिजिटल’ नजर

लोकसहभागातून बारामती एमआयडीसी होणार सुरक्षित; ५७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे सज्ज, पोलीस आणि उद्योजकांचा स्तुत्य पुढाकार; ८.७० लाखांच्या निधीतून बारामती परिसरात सुरक्षेचे कवच

0 6 9 9 2 8

बारामती : नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून आणि स्थानिक उद्योजकांच्या सहकार्यातून ८ लाख ७० हजार रुपये खर्चाचे एकूण ५७ कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

या उपक्रमामुळे एमआयडीसी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यास आणि महिला व नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळण्यास मोठी मदत होणार आहे. एमआयडीसीमधील प्रमुख चौक, औद्योगिक क्षेत्र आणि गर्दीच्या ठिकाणी हे कॅमेरे टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केले जात आहेत.

या प्रकल्पासाठी बारामती कॅटल फीडचे अभिजित शिंदे, कृष्णा ताटे, तांदुळवाडीचे दिगंबर बेलदार आणि काटेवाडीचे उपसरपंच श्रीधर घुले यांनी मोठे आर्थिक योगदान दिले. या सर्व मान्यवरांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला. याकामी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, निलेश वाकळे आणि नितीन ढवण यांनी विशेष परिश्रम घेतले.

​या शुभारंभ प्रसंगी एमआयडीसीचे विभागीय कार्यकारी अधिकारी हनुमंतराव पाटील, बीआयडीएचे अध्यक्ष धनंजय जामदार, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “सीसीटीव्हीमुळे केवळ गुन्हेगारांवर वचक निर्माण होणार नाही, तर नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना वाढेल,” असा विश्वास यावेळी पोलीस निरीक्षक यादव यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे