Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

डॉ.तनपुरे साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अरुण तनपुरे यांची बिनविरोध निवड, डिसेंबर अखेर कारखाना चालू करणार – तनपूरे

0 6 4 8 8 7

अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी

डॉक्टर बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या  चेअरमनपदी जिल्हा बॅकेचे संचालक व राहुरी बाजार समितीचे विद्यमान चेअरमन अरुण बाबुराव तनपुरे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.

डॉ. तनपूरे साखर कारखान्याच्या सलग्न संस्था विवेकानंद नर्सिग होमच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली याबैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील हे होते.या बैठकीत चेअरमन पदासाठी अरुण बाबुराव तनपुरे यांच्या नावाची सुचना भारत नानासाहेब वारुळे यांनी मांडली तर रावसाहेब यादव तनपुरे यांनी अनुमोदन दिले.चेअरमनपदासाठी एकमेव अरुण तनपुरे यांच्या नावाची सुचना आल्याने प्रांतधिकारी सावंत पाटील यांनी चेअरमनपदी अरुण तनपुरे यांची निवड झाल्याचे जाहिर केले.

चेअरमन निवडी नंतर सन्मान सोहळ्यात सभासदांसमोर बोलताना अरुण तनपुरे म्हणाले की,असे वाटले होत की ही निवडणूक बिनविरोध होईल. तसा प्रयत्नही केला,पण निवडणूक बिनविरोध झाली नाही.मतदानातून सभासदांनी जनसेवा मंडळाच्या बाजूने कौल दिला.गेल्या सहा महिण्यापासून  हा कारखाना कसा चालू करता येईल यासाठी प्रयत्न करत होतो.सुदैवाने हिरवा कंदील  मिळाला आहे. व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक लवकरच होईल.गेली 2 ते 3 वर्षे कारखाना बंद आहे.बऱ्याच उणिवा आहेत त्या उणिवा दूर करून कारखाना चालू करायचा आहे.डिसेंबरच्या आत कारखाना चालू करायचा प्रयत्न आहे.

या बैठकीला हर्ष अरुण तनपुरे,रावसाहेब यादव तनपुरे,जनार्दन लक्ष्मण गाडे, अशोक सिताराम तमनर,अरुण नानासाहेब ठोकळे,किसन कारभारी जवरे,भास्कर जगन्नाथ ढोकणे,प्रमोद रावसाहेब तारडे, वैशाली भारत तारडे,सुनील भानुदास मोरे,मीना सुरेश करपे,ज्ञानेश्वर बळीराम खुळे, ज्ञानेश्वर हरी पवार,कृष्णा नानासाहेब मुसमाडे, अरुण कोंडीराम ढुस,भारत नानासाहेब वारुळे,अशोक ज्ञानदेव उऱ्हे, ज्ञानेश्वर भास्कर कोळसे,सपना प्रकाश भुजाडी, जनाबाई धोंडीराम सोनवणे आदी संचालक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एम.पाटील शिरसाठ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब तनपुरे यांनी केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एम.डी.सोनवणे,अप्पासाहेब जाधव,नवाज शेख,सुरेश वाबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कवाणे यांनी केले तर आभार हर्ष तनपूरे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे