Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वडगाव निंबाळकर येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात साजरी;  विविध क्षेत्रातील ४० मान्यवरांचा सन्मान

0 8 8 5 3 0

वडगाव निंबाळकर : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३५ व्या जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर येथील उमाजी नाईक समाज मंदिर येथे मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी एका विशेष सत्कार समारंभाचे व विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, वडगाव निंबाळकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

प्रतिष्ठानचे हे सलग चौथे वर्ष असून, जयंती उत्सवातील अनावश्यक गोष्टी आणि खर्चाला फाटा देत विधायक कामांना महत्त्व देण्याची आदर्श परंपरा प्रतिष्ठानने जपली आहे. याचाच एक भाग म्हणून दर वर्षी गावातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येतात व विजेत्या मुलांना बक्षीस देऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात येते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुनील खोमणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक व विधायक कामांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमानिमित्त मागील वर्षभरात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि कृषी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून नावलौकिक मिळवलेल्या सुमारे ४० मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ. रोहिणीताई ढोले, बारामती पंचायत समितीचे सदस्य श्री. जितेंद्र पवार, सोमेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक श्री. शिवाजी राजे निंबाळकर, माजी संचालक श्री. अनिल शेठ शहा, वडगाव वि. का. सोसायटीचे चेअरमन श्री. दीपक तात्या शिंदे, बारामती तालुका दूध संघाच्या संचालिका सौ. शोभा जगताप, प्रशासक तथा सरपंच श्री. सुनील ढोले, उपसरपंच सौ. संगीता शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

यासोबतच जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री महेश जाधव,युवा नेते भैयाराजे राजेनिंबाळकर. प्रगतशील बागायतदार श्री.राजू शेठ शहा, उद्योजक श्री. सचिन साठे, सामाजिक कार्यकर्ते श्री. छबुराव साळवे, श्री. अर्जुन खोमणे यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.एम. जाधव सर यांनी केले 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे