Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई: वरुडे येथील ५ घरफोड्यांचा उलगडा, मुख्य आरोपी गजाआड; दोन फरार साथीदारांचा शोध सुरू

0 9 6 5 0 5

शिक्रापूर (दि. १६): वरुडे (ता. शिरूर) येथे एकाच रात्रीत पाच घरांमध्ये घरफोडी करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. अनिल निदान भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या दोन फरार साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
वरुडे गावामध्ये काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी एकाच वेळी तब्बल पाच घरांना लक्ष्य केले होते. या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी विठ्ठल दत्तात्रय डांगे (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकाच वेळी पाच घरे फोडल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीची सांगड घालत आरोपींचा माग काढला. या तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिल निदान भोसले (वय ४४, रा. थोरला मळा, मोराची चिंचोली, ता. शिरूर, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने या पाचही घरफोड्या केल्याची कबुली दिली असून, त्याला रीतसर अटक करण्यात आली आहे.

या टोळीतील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला असला तरी त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. तसेच, अटक करण्यात आलेल्या अनिल भोसले याने यापूर्वी अशाच प्रकारच्या आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का, यादृष्टीनेही तपास केला जात असून, यातून अनेक मोठे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, तसेच पोलीस अंमलदार रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, संदिप बनकर, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे आणि भारत भोसले यांच्या विशेष पथकाने ही कामगिरी बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संदिप बनकर हे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे