Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसोशल मिडिया

आताची धक्कादायक बातमी, समाजमाध्यमांचा अल्पवयीन मुलांचा वापर किती धोकादायक ?, प्रकरण बलात्कारापर्यत !

0 7 9 2 2 2

बारामती : समाज माध्यमांचा अल्पवयीन मुलांच्या जीवनात वाढता समावेश हा आजच्या डिजिटल युगातील एक महत्वाचा विषय बनला आहे.अनेक अल्पवयीन मुलं आणि किशोरवयीन तरुण तरूणी विविध समाज माध्यमांचा वापर करतात, मात्र यामुळे काही दुष्परिणाम देखील उद्भवू शकतात.मुले ऑनलाइन मित्रता, लाइक्स आणि फॉलोवर्सच्या नादात वाहत चालली आहेत कि अशी आजची परिस्थिती आहे,समाज माध्यमांचा अल्पवयीन मुलांच्या वापरामुळे अनेक धोकादायक परिणाम होऊ शकतात किंबहुना समाजात घडताना समोर येत आहेत.

याचेच जिवंत उदाहरण बारामतीत एका अल्पवयीन मुलीवर समाज माध्यमातून ओळख निर्माण करून त्याचा गैरफायदा घेत वारंवार बलात्कार झाल्याचे समोर आले आहे.

याविषयी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर हकिकत अशी कि एप्रिल 2025 ते दि. 17/10/2025 यादरम्यान इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट वरून पीडित मुलीशी ओळख निर्माण करून तिला चॉकलेट तसेच वेगवेगळ्या भेटवस्तू  देऊन तिच्याशी ओळख वाढवून पिडीतेच्या राहत्या घरी तसेच  घराशेजारील छप्परामध्ये आरोपी वय वर्षे २३ याने पिडीत मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तीला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्यासोबत जबरदस्तीने वारंवार शारिरिक संबंध करून तिच्यावर बलात्कार केला आहे अशी माहिती मिळाली आहे.

आरोपी हा एका राजकिय पक्षाच्या विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे.

या घटनेबाबत पिडीतेच्या आईने आरोपी- वय २३ वर्ष रा. एमआयडीसी बारामती ता. बारामती जि.पुणे याच्या 

विरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.दिलेल्या तक्रारीवरून बारामती शहर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

वरील घटनेत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे कि पिडीत मुलीने तिच्या आईच्या फोन मध्ये आईच्या नावाने (अकाउंट) खाते तयार करून ती याचा वापर करत होती व हे तिच्या आईला देखील माहित नव्हते.

वरील गुन्ह्याचा पुढिल तपास उपविभागीय अधिकारी भट्टे बारामती, विभाग बारामती हे करीत आहेत.

 

वरील घटनेच्या अनुषंगाने विचार करायला लावणाऱ्या गोष्टी,

जर आपली अल्पवयीन मुले मुली,अल्पवयीन पाल्य समामाध्यमांचा वापर करत असतील तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.

समाज माध्यमांचा अल्पवयीन मुलांचा वापर अनेक धोक्यांचा तसेच अडचणींना सामना करायला भाग पाडू शकते. जसे की मुलं ऑनलाइन जगात अधिक वेळ घालवू लागतात,ज्यामुळे त्यांचे वास्तविक जीवनातील संबंध प्रभावित होतात.सतत तुलना, ट्रॉलिंग आणि नकारात्मक शब्दांमुळे चिंता, उदासी आणि आत्मविश्वास कमी होण्याचा धोका वाढतो.सततच्या विचलनामुळे अभ्यासात कमी लक्ष केंद्रित होण्याचा संभव असतो.

समाज माध्यमांवरील ‘आयुष्याची छटा’ सहसा खोटी असते, ज्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक प्रभाव पडतो.

ऑनलाइन शोषन, ब्लॅकमेलिंग,मुलांची बदनामी,छायाचित्रांवरून शिकार, बलात्कार, आर्थिक लुट जर अशा घटना घडाल्या तर मुलांच्या मानसिक स्वास्थावर होणारे परिणाम,जसे की चिंता,नैराश्य,आणि आत्मसन्मान कमी होणे,यांचा समावेश असू शकतो.किंवा याही पुढे जाऊन मुले आत्महत्या सुध्दा करतात अशाही काही घटना आपल्या वाचणात किंवा पहाण्यात येते.

यामुळे पालकांनी मुलांच्या ऑनलाइन उपस्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.व आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन व सुरक्षा नियमांची माहिती करून देणे व समाज माध्यमांच्या वापरावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे, आवश्यक आहे.पालकांनी आणि शाळांनीही त्या त्या वयातील मुलांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, जेणेकरून मुलांना सुरक्षित आणि सकारात्मक अनुभव मिळू शकेल,समाज माध्यमांचा वापर आवश्यक आहे, मात्र त्याचा कायदा व त्याची सुरक्षा लक्षात घेणे खुप गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन आणि शिस्तीच्या माध्यमातून या दुष्परिणामांची शक्यता कमी केली जाऊ शकते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे