Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ब्रेकिंग बारामती: वृंदावन हॉटेल हाणामारी प्रकरणाचा मुख्य आरोपी अटकेत! ​पार्किंगच्या वादातून तरुणावर केला होता खुनी हल्ला; बारामती तालुका पोलिसांची कारवाई.

0 5 9 3 8 7

बारामती :  भिगवण रोडवरील हॉटेल वृंदावन समोर पार्किंगच्या कारणावरून झालेल्या तुंबळ हाणामारी आणि जीवघेण्या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. तन्मेष सुधीर साळुंखे असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काही दिवसांपूर्वी (दि. २९ नोव्हेंबर) बारामतीतील तानाई नगर येथील रहिवासी मानस दीपक पाटील हे आपल्या मित्रांसह जेवणासाठी हॉटेल वृंदावन येथे गेले होते. यावेळी हॉटेलबाहेर वाहनांच्या पार्किंगवरून त्यांचा काही तरुणांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपी तन्मेष साळुंखे, राम लोखंडे, माउली रणदिवे, ओंकार भोसले आणि त्यांच्या ११ ते १२ साथीदारांनी मानस पाटील आणि त्यांच्या मित्रांवर दगड आणि लोखंडी गजांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुणांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याची दखल घेत बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीच पोलिसांनी राम अनिल लोखंडे (वय २४) याला अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी फरार असल्याने पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. अखेर १३ जानेवारी रोजी पोलिसांना तन्मेष साळुंखे याला जेरबंद करण्यात यश आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पो.उपनि. युवराज पाटील, हवालदार मनोज पवार, सागर देशमाने, भारती खंडागळे, पोलीस अंमलदार राजू बन्ने व दादा दराडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पीएसआय युवराज पाटील करीत आहेत.

 “बारामती तालुक्यात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येईल,” असा सज्जड दम पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे