सासवड (पुणे): गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सासवड पोलिसांनी धडक कारवाई करत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील १४ सराईत आरोपींना हद्दपार केले आहे.
पुणे ग्रामीणचे बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या २४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) (३) अन्वये या १४ आरोपींना दिनांक १९ सप्टेंबर २०२६ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार केलेले हे आरोपी सासवड पोलीस स्टेशन हद्दीत अथवा कोणत्याही सार्वजनिक गणपती मंडळाच्या मिरवणुकीदरम्यान मिळून आल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सासवड पोलिसांनी दिला आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे:
१) अमित सुरेश गायकवाड (रा. भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे)
२) अभिजीत विष्णू कांबळे (रा. हिवरकरमळा, ता. पुरंदर, जि. पुणे)
३) आदित्य शांताराम जाधव (रा. कोडीत, ता. पुरंदर, जि. पुणे)
४) आदित्य तानाजी चौधरी (रा. नारायणपुर, ता. पुरंदर, जि. पुणे)
५) जयवंत गुलाब यादव (रा. यादववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)
६) गौरव उर्फ मायाभाई बाळासाहेब कामथे (रा. खळद, ता. पुरंदर, जि. पुणे)
७) सुरज उर्फ भैय्या प्रकाश आहेर (रा. खंडोबानगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे)
८) सनी लालजी सोळंकी (रा. आंबोडी, ता. पुरंदर, जि. पुणे)
९) सचिन विश्वास जाधव (रा. इंदिरानगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे)
१०) नंदकिशोर / सनी पांडुरंग माने (रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे)
११) सुरज उर्फ बिट्टू माने (रा. कैकाडीआळी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे)
१२) महेंद्र गोपीचंद जगताप (रा. ताथेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)
१३) शुभम संजय पांडे (रा. भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे)
१४) प्रथमेश सचिन जगताप (रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे)
सदरची महत्त्वपूर्ण कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि भोर-सासवड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा