
पुणे: महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विविध प्रवर्गांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना २०२५ या वर्षाकरिता अत्यंत मानाचे ‘पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह’ जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक व शौर्य पदक प्राप्त अधिकाऱ्यांना तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्यांना हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान केले जाते.
पोलीस दलात धडाडीचे आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांसाठी हा सन्मान अत्यंत प्रेरणादायी ठरतो. या प्रतिष्ठेच्या यादीत पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनेक उल्लेखनीय नावांचा समावेश असून, सन्मानित अधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.
पुणे शहर पोलीस दल:
पोलीस निरीक्षक – वाहिद अकबर पठाण
सहायक पोलीस उप निरीक्षक – विजया शिवाजी खुटवड
सहायक पोलीस उप निरीक्षक – रुस्तुम इसाक मुजावर
सहायक पोलीस उप निरीक्षक – प्रविण ज्ञानदेव शिंदे
पोलीस हवालदार – आश्रुबा चांगदेव मोराळे
पोलीस हवालदार – सलीम इन्नुस तांबोळी
पोलीस हवालदार – रामदास निवृत्ती गोणते
पोलीस हवालदार – निलेश सोपान पर्वते
पोलीस हवालदार – दयाराम दादाराव शेगर
पोलीस हवालदार – शंकर बाबुराव कुंभार
पोलीस हवालदार – अमोल परशुराम पिलाणे
पोलीस हवालदार – सौदुबा आप्पाराव भोजराव
पोहवा चालक – सुजित महादेव पवार
पोलीस शिपाई – प्रगती रामहरी ठोंबरे
पुणे ग्रामीण पोलीस दल:
सहायक पोलीस निरीक्षक – कुलदीप दत्तात्रय संकपाळ
सहायक पोलीस निरीक्षक – सचिन नथाराम लोखंडे
पोलीस उप निरीक्षक – जगदेवप्पा इरन्ना पाटील
सहायक पोलीस उप निरीक्षक – विनोद शामराव भोकरे
सहायक पोलीस उप निरीक्षक – सुहास मुरलीधर पवार
सहायक पोलीस उप निरीक्षक – महेश जानकू बनकर
सहायक पोलीस उप निरीक्षक – दिपाली सुदर्शन कहडणे
पोलीस हवालदार – राहुल दत्तात्रय पवार
पोलीस शिपाई – अमित जनार्दन पाचार्णे
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या सन्मानचिन्हाने गौरवण्यात आलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा