गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
चार सराईत आरोपींना मर्सिडिज कारसह अग्निशस्त्र व जिवंत काडतुसांसह केले जेरबंद, खंडणी विरोधी पथक २,गुन्हे शाखेची कारवाई.

0
6
4
8
8
8
पुणे : खंडणी विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा,पुणे शहर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, तडीपार असलेला आरोपी हा त्याच्या मित्रासोबत पांढऱ्या रंगाच्या मर्सिडिज कार मधुन फुरंसुगी पोलीस ठाणे हद्दीत फिरत आहे.
बातमीच्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक गौरव देव यांनी खात्री करुन सदरची बातमी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, युनिट-६, गुन्हे शाखा व अतिरीक्त कार्यभार खंडणी विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा पुणे शहर यांना वरील बातमीचा आशय सांगितला, त्यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन मिळालेल्या माहितीप्रमाणे खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक गौरव देव व खंडणी विरोधी पथक ०२ कडील पोलीस अंमलदार यांनी मंतरवाडी फाटा येथे थांबुन रात्री ०१/१० वा. चे सुमारास सापळा रचुन १) अमर हनुमंत गाडे, वय २९ वर्षे, रा. थिटे वस्ती, समर्थ हॉस्पीटल शेजारी खराडी पुणे २) गोपाळ संजय यादव, वय २६ वर्षे, रा. कामठीपुरा, ता. शिरुर जि. पुणे, ३) सनी संजय यादव, वय २७ वर्षे, रा. कामठीपुरा, ता. शिरुर जि. पुणे व ४) निशांत भगवान भगत, वय २७ वर्षे, रा. भेकराईनगर पापडे वस्ती, संजोदा कॉम्पलेक्स शेजारी, फुरसुंगी पुणे यांना ताब्यात घेण्यात आले.
यावेळी आरोपी अमर हनुमंत गाडे याचे कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुस मिळुन आली.
आरोपी अमर हनुमंत गाडे याचे कडे जप्त करण्यात आलेल्या गावठी बनावटीच्या पिस्तूलाबाबत अधिक चौकशी केली असता त्यांने सांगीतले की, हे पिस्तूल त्याने स्वतःचे स्वसंरक्षणासाठी त्याचे मित्र गोपाळ संजय यादव व निशांत भगवान भगत यांचे सोबत दिनांक ११/०५/२०२५ रोजी सेंदवा राज्य मध्यप्रदेश येथे जावुन विकत घेतले असुन पिस्तूल खरेदी करण्यासाठी रोख पैसे सनी संजय यादव याने दिल्याचे सांगितले आहे.
या चारही आरोपींवर पुणे शहर व इतर ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
या बाबत फुरसुंगी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३३३/२०२५ आर्म ॲक्ट क. ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यामध्ये एक अग्निशस्त्र, तीन जिवंत काडतुसे व एक मर्सिडिज कंपनीची CLA 200 CDI मॉडेलची कार असा एकुण १०,४१,५००/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, सचिन रणदिवे, किरण पडयाळ, चेतन आपटे, दिलीप गोरे, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, गणेश खरात व पवन भोसले यांनी केली आहे.





