
बारामती :डॉ.सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग हे 3 जुन 2025 रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भेट देण्याकरीता निघाले असताना पेन्सिल चौक बारामती येथे भिगवण बाजुकडुन एक काळया काचा असलेली विनानंबरप्लेटची एक स्विफ्ट कार भरधाव वेगाने रहदारीच्या नियमांचे उल्लघंन करून येत असलेली दिसली,

डॉ.सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांनी पेन्सिल चौक येथे वाहतुक नियमन करीत असलेले अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना सदर वाहनांस थांबविण्याच्या सुचना दिल्या.
पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी सदर वाहनांस थांबवुन त्या चालकांकडे विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव राहुल राजेंद्र मदने रा.प्रगतीनगर ता.बारामती जि.पुणे असे सांगुन सदर गाडीबाबत विचारपुस केली.

त्याने सदर गाडी हि त्याचा मित्र महेश बापुसाहेब चौधरी रा.शिरूर जि.पुणे याची असलेचे सांगुन गाडीमध्ये असलेल्या इतर जनांची चौकशी केली असता त्यामध्ये अक्षय भिमराव कांबळे रा.आमराई ता.बारामती जि.पुणे असे सांगितले सदर इसमांची अधिक चौकशी केली असता अक्षय कांबळे हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले,त्याचेवर बारामती शहर पोलीस ठाण्याकडे तडीपार प्रस्ताव तयार असल्याने त्याचेवर पुढील कारवाई करण्याकरीता त्यांस बारामती शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.

वाहन चालक राहुल मदने याच्यावरही दोन गुन्हे दाखल असुन त्याने त्याच्या ताब्यातील वाहन रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालविल्याने त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास बारामती तालुका पोलीस ठाणे करीत आहे.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा