
बारामती: बारामती आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून ओव्हरलोड वाहनांवर होणारी कारवाई व त्यांच्यावर दरमहा होणारी वसुली याच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चे (राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपकभाऊ निकाळजे) सचिनभाऊ खरात पुणे जिल्हा अध्यक्ष,यांच्या वतीने सुरेंद्र निकम प्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती यांना नुकतेच निवेदन देण्यात आले,

या निवेदनात असे म्हटले आहे की,ओव्हरलोड वाहनांवर दरमहा होणारी वसुली कायमस्वरूपी बंद करण्यात यावी तसेच मागील 3 वर्षापासून आरटीओ बारामती करत असलेले बेकायदेशीर हप्ते वसुली बंद करावी,तसेच वाहन निरीक्षक साळोखे यांना बारामती आर टि ओ येथे 3 वर्षे झाली आहे तरीही त्यांनी पैसे भरून बदली 1 वर्ष स्थगित केली आहे, कारण हे एजंट यांच्यामार्फत वसुली घेतात,

दरमहा एका ट्रककडून 2500 रुपये प्रमाणे गोळा करतात व अधिकारी यांना देतात,आरटीओ बारामती यांना कोटी ने पैसे देतात तसेच पत्रकार व वाहतूक संघटनेने आंदोलन करूनही हि हफ्तेखोरी वसुली करण्याचे थांबत नाही, चालक महादेव तनपुरे व इतर यांच्यामार्फत ओव्हरलोड वाहने यांचेकडून प्रत्येकी 2500 रुपये प्रमाणे 3020 वाहने प्रमाणे 2500 असे एकूण 3020×2500 = 75.50000/- रूपये,75 लाख 50 हजार रुपये दरमहा बेकायदेशीर पैसे गोळा करतात. मगर एजंट सारखे नऊ एजंट या वसुलीसाठी आहेत.

गरीब चालकांची होणारी लुट थांबली पाहिजे व हे वसुली रॅकेट बंद होण्याकरिता आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन येणाऱ्या कार्यकाळात करणार आहोत.वसुली रॅकेट बंद न झाल्यास व त्यांच्यावर कारवाई न झाल्यास यास सर्वस्वी बारामती आरटीओ व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी,

वेळीच ओव्हरलोड वाहनांचे हफ्ते बंद न झाल्यास 11 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) च्या शेकडो कार्यकर्ते यांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन बारामती आरटीओ कार्यालयासमोर घेणार आहोत याची नोंद असावी असे निवेदन आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देऊन आरटीओ कार्यालयात होत असलेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी कडक इशारा दिला आहे.
यावेळी आरटीओ अधिकारी सुरेंद्र निकम यांनी आम्ही योग्य ती कारवाई करू व याआधी देखील कारवाई केली असून आपल्या निवेदनानुसार पुन्हा कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा